जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज फाफ डु प्लेसिसला इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. डू प्लेसिसव्यतिरिक्त, कगिसो रबाडा, पीट व्हॅन बिलजोन, बजोर्न फॉर्ट्युइन आणि रीजा हेंड्रिक्स यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - अवघ्या ३६ चेंडूत १०० ठोकणारा कोरी अँडरसन आता 'या' देशाकडून खेळणार?
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) एका निवेदनात म्हटले आहे की, "या खेळाडूंना संघातून सोडण्यात आले आहे, जेणेकरून ते सीएसएच्या चार दिवसीय स्थानिक स्पर्धेत त्यांच्या फ्रेंचायझीसह भाग घेऊ शकतील किंवा विश्रांती घेतील. या खेळाडूंमध्ये फाफचा समावेश आहे.''
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत डु प्लेसिसने भाग घेतला. त्याने एकूण १२१ धावा केल्या होत्या.
संघ : क्विंटन डी कॉक (कर्णधार / विकेटकीपर), टेंबा बावुमा, ज्युनियर डाला, ब्युरन हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, जानेमान मलान, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉट्र्जे, अँडिले फेहलूक्वायो, तबरेज शम्सी, लुथा सिपाम्ला, जोन-जोन स्मट्स, ग्लेन्टन स्ट्रूमॅन, रासी व्हॅन डर डुसेन, काइल व्हेरिएन.