प्रिटोरिया - दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज फाफ डु प्लेसिसने आपली बॅट आणि गुलाबी एकदिवसीय जर्सीचा लिलाव केला आहे. या लिलावातून मिळालेली पैसे त्याने कोरोना व्हायरसशी लढणार्या गरजू मुलांना दिले आहेत. प्लेसिसच्या या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
डु प्लेसिसने आयएक्सयू बॅट आणि 18 क्रमांकाच्या गुलाबी जर्सीचा लिलाव केला आहे. ''आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की कोरोनामुळे बरेच लोक झगडत आहेत आणि त्याचा परिणाम दक्षिण आफ्रिकेतही आपण पाहत आहोत. मी डीव्हिलियर्सचे आव्हान स्वीकारले आहे. मी माझी नवीन आयएक्सयू बॅट आणि गुलाबी वनडे जर्सी दान केली आहे'', असे त्याने इन्स्टाग्रामवर सांगितले. 2016 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात डु प्लेसिसने ही जर्सी परिधान केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
36 वर्षीय डु प्लेसिसने यापूर्वी अनेक वेळा मदत केली आहे. हिलांग आफ्रिका फाउंडेशनच्या अंतर्गत हा लिलाव झाला आहे. यापूर्वी, डु प्लेसिस आणि त्याच्या पत्नीने आफ्रिकेतील 3500 भुकेलेल्या मुलांना जेवण दिले होते.
डु प्लेसिस आणि रग्बी संघाचा कर्णधार सिया कोलिसी यांनी कोरोनाच्या संकटात गरजू लोकांना मदत केली होती. या दोन खेळाडूंनी केपटाऊनमधील गरजू लोकांना घरी अन्न पोचवण्याचे काम केले आणि त्यांना आवश्यक गोष्टी दोखील पुरवल्या होत्या.