ग्रॅनडा - विंडीज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने विंडीजचा २९ धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या ४१९ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव ३८९ धावांत संपुष्टात आला. विजयासह इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून १५० धावांची दीडशतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
WHAT A MATCH!
— ICC (@ICC) February 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
West Indies make their highest ever ODI total of 389 but Jos Buttler's 150, a century from captain Morgan, Adil Rashid's five-for and four wickets from Mark Wood help England to victory by 29 runs!#WIvENG scorecard ➡️ https://t.co/Nq5TqAKpGj pic.twitter.com/jUqlLOMLO0
">WHAT A MATCH!
— ICC (@ICC) February 27, 2019
West Indies make their highest ever ODI total of 389 but Jos Buttler's 150, a century from captain Morgan, Adil Rashid's five-for and four wickets from Mark Wood help England to victory by 29 runs!#WIvENG scorecard ➡️ https://t.co/Nq5TqAKpGj pic.twitter.com/jUqlLOMLO0WHAT A MATCH!
— ICC (@ICC) February 27, 2019
West Indies make their highest ever ODI total of 389 but Jos Buttler's 150, a century from captain Morgan, Adil Rashid's five-for and four wickets from Mark Wood help England to victory by 29 runs!#WIvENG scorecard ➡️ https://t.co/Nq5TqAKpGj pic.twitter.com/jUqlLOMLO0
विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो (५६ धावा) आणि अॅलेक्स हेल्स (८२ धावा) यांनी १३.५ षटकात १०० धावांची आक्रमक सलामी दिली. दोघे सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेला जो रुटही ५ धावा करुन लवकर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार ओएन मॉर्गन (१०३ धावा) आणि जोस बटलर (१५० धावा) यांनी डावाची सुत्रे हातात घेताना विंडीजच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. दोघांनी मिळून अवघ्या १२७ चेंडूत २०४ धावांची भागीदारी केली. मोर्गन बाद झाल्यानंतर बटलरने आक्रमक फलंदाजी करत संघाला ४०० चा टप्पा गाठून दिला. बटलरने त्याच्या १५० धावांच्या खेळीत १३ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली.
इंग्लंडच्या ४१९ धावांचा पाठलाग करण्यासाठी विंडीजकडून सलामीसाठी ख्रिस गेल आणि जॉन कॅम्पबेल यांची जोडी मैदानात उतरली. ख्रिस गेलने आक्रमक फलंदाजी करताना ९७ चेंडूत १६२ धावांची खेळी करत विंडीजचे आव्हान कायम राखले. ख्रिस गेलशिवाय डॅरेन ब्राव्हो (६१ धावा) आणि कार्लोस ब्रॅथवेट (५० धावा) यांनी विंडीजला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, इंग्लंडच्या आदिल रशीदने चांगली गोलंदाजी करताना विंडीजचे ५ गडी बाद करत सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूने वळवला. मार्क वूडनेही चांगली गोलंदाजी करताना विंडीजची मध्यफळीतील फलंदाजांना बाद करत ४ गडी बाद केले.