बार्बाडोस - विंडीज आणि इंग्लंड यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. किंग्जस्टन ओव्हल येथे झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने ३६० धावांचे आव्हान पार करत धमाकेदार विजय मिळवला. विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १२३ धावांच्या खेळीसाठी जेसन रॉयला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
What an incredible victory for England!
— ICC (@ICC) February 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They've chased down 361 – it's England's highest successful run-chase in ODI cricket! Jason Roy and Joe Root have led the way with centuries to help England go 1-0 up in the series. #WIvENG | SCORECARD ⬇️
https://t.co/pQbWOWuEQM pic.twitter.com/xnc1hAiLlA
">What an incredible victory for England!
— ICC (@ICC) February 20, 2019
They've chased down 361 – it's England's highest successful run-chase in ODI cricket! Jason Roy and Joe Root have led the way with centuries to help England go 1-0 up in the series. #WIvENG | SCORECARD ⬇️
https://t.co/pQbWOWuEQM pic.twitter.com/xnc1hAiLlAWhat an incredible victory for England!
— ICC (@ICC) February 20, 2019
They've chased down 361 – it's England's highest successful run-chase in ODI cricket! Jason Roy and Joe Root have led the way with centuries to help England go 1-0 up in the series. #WIvENG | SCORECARD ⬇️
https://t.co/pQbWOWuEQM pic.twitter.com/xnc1hAiLlA
विंडीजने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात विंडीजकडून दीर्घकाळानंतर पुनरागमन करत असलेल्या ख्रिस गेलवर सर्वांच्या नजरा होत्या. गेलने धमाकेदार खेळी करताना १२९ चेंडूत १३५ धावांची खेळी केली. त्याने खेळीत ३ चौकार आणि १२ षटकार खेचले. त्याचे हे कारकिर्दीतले २४ वे शतक ठरले. शाई होपनेही चांगली फलंदाजी करताना ६४ धावा केल्या तर, तळातील फलंदाज अॅश्ले नर्सने ८ चेंडूत २५ धावा करत इंग्लंडसमोर ३६० धावांचे मोठे आव्हान उभे केले.
विंडीजच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडला आहे, असे वाटत होते. परंतु, इंग्लंडकडून जेसन रॉय १२३ धावा आणि जो रुटने १०२ धावा करत शतकी खेळी केल्या. कर्णधार ओएन मॉर्गननेही चांगली फलंदाजी करताना ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने ६ गड्यांनी आरामात विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग ठरला.