शारजाह - रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिचा, डान्सचा एक व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आयपीएल पाहण्यासाठी धनश्री ही युएईमध्ये गेली आहे. तिथून तिने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे.
बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि किराया अडवाणी यांच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटातील, बुर्ज ए खलिफा या गाण्यावर धनश्रीने डान्स केला आहे. धनश्री ही दुबईमध्ये वास्तव्याला आहे. आपल्या हॉटेलच्या बाल्कनीमध्ये धनश्रीने हा डान्स केला आहे. यावेळी धनश्रीने लाल रंगाचा ड्रेस परीधान केला आहे.
डान्समध्ये धनश्रीने काही नवीन स्टेप्सही केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच धनश्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळत आहे. या डान्सचा व्हिडीओ धनश्रीनेच आपल्या इंस्टारग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी बरेच लाइक्स दिले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनश्रीने विमानतळावरही डान्स केला होता. त्यावेळी तिच्या डान्सचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. धनश्री ही डॉक्टर आहे. त्यासोबत ती एक यूट्यूब डान्सर देखील आहे. त्याच्या युट्यूब चॅनलच्या सब्सक्राइबरची संख्या २० लाखांच्या घरात आहे. याशिवाय त्यांच्या इंन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या १९ लाख इतकी आहे.
हेही वाचा - चेन्नईचा संघ गुणतालिकेत शेवटी राहण्याच्या पात्रतेचा - स्टीफन फ्लेमिंग
हेही वाचा - IPL २०२० : आयपीएल इतिहासात 'या' घटना पहिल्यादांच घडल्या, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या घटना..