ETV Bharat / sports

राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल पाकिस्तानच्या खेळाडूने व्यक्त केला आनंद

author img

By

Published : Aug 7, 2020, 7:38 AM IST

कनेरिया ट्विटरवर म्हणाला, "भगवान रामाची सुंदरता त्याच्या चरित्रात आहे, त्याच्या नावावर नाही. ते असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहेत. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा आनंदाचा क्षण आहे." उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत हेही या भूमिपूजनास उपस्थित होते.

danish kaneria expressed happiness over ram mandir lay of foundation
राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल पाकिस्तानच्या खेळाडूने व्यक्त केला आनंद

लाहोर - अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने आनंद व्यक्त केला आहे. हा एक आनंदाचा क्षण असून जगभरात आनंदाची लाट असल्याचे कनेरियाने सांगितले. अयोध्येमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य समारोहात राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.

कनेरिया ट्विटरवर म्हणाला, "भगवान रामाची सुंदरता त्याच्या चरित्रात आहे, त्याच्या नावावर नाही. ते असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहेत. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा आनंदाचा क्षण आहे." उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत हेही या भूमिपूजनास उपस्थित होते.

  • The beauty of Lord Rama lies in his character, not in his name. He is a symbol of the victory of right over the evil. There is wave of happiness across the world today. It is a moment of great satisfaction. #JaiShriRam pic.twitter.com/wUahN0SjOk

    — Danish Kaneria (@DanishKaneria61) August 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) निर्णयानुसार, कनेरियावर क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती. तो स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) आजीवन बंदी उठवून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून त्याचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत २६१ तर एकदिवसीय सामन्यांत १५ बळी घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.