ETV Bharat / sports

रुग्णालयातून गेल म्हणतो, ''मी युनिव्हर्स बॉस'' - chris gayle hospital post

गेलने या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. गेलने इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले, "मी हे तुम्हाला सांगू शकतो. लढा न देता मी कधीही हार मानणार नाही. मी युनिव्हर्स बॉस आहे.''

chris gayle shares picture of himself chilling on hospital bed
रुग्णालयातून गेल म्हणतो, ''मी युनिव्हर्स बॉस''
author img

By

Published : Oct 11, 2020, 4:47 PM IST

दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्टार फलंदाज ख्रिस गेलला पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यानचा एक फोटो गेलने शेअर केला असून या फोटोला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. आयपीएलमध्ये शनिवारी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. गेलने या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

गेलने इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले, "मी हे तुम्हाला सांगू शकतो. लढा न देता मी कधीही हार मानणार नाही. मी युनिव्हर्स बॉस आहे. ते कधीच बदलणार नाही. माझ्याकडून तुम्हाला शिकता येईल. पण मी जे करतोय त्याचे अनुसरण तुम्ही करावे असे माझे मत नाही. माझी शैली आणि चमक विसरू नका. आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद."

''ख्रिस गेल या सामन्यात खेळणार होता. पण त्याला पोटदुखीमुळे अंतिम ११मध्ये स्थान मिळालेले नाही'', असे पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने या सामन्याआधी सांगितले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले. कर्णधार के. एल. राहुल (७४) व मयंक अग्रवाल (५६) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत पंजाबने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पण केकेआरच्या गोलंदाजांनी अखेरच्या तीन षटकात टिच्चून मारा करत सामना जिंकला. हा पंजाबचा सलग पाचवा पराभव होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.