ETV Bharat / sports

चेतेश्वर पुजाराही वर्णभेदाचा बळी? माजी कर्णधाराने केला खुलासा - यॉर्कशायर काउंटी संघ वर्णभेद बातमी

जगभरातील वर्णभेदविरोधी आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंनी आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. आता क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराबद्दलही एक प्रकरण समोर आले आहे.

cheteshwar-pujara-is-also-a-victim-of-apartheid
चेतेश्वर पुजाराही वर्णभेदाचा बळी? या माजी कर्णधाराने केला खुलासा
author img

By

Published : Dec 5, 2020, 8:53 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येनंतर जगभरात वर्णभेदविरोधात आंदोलन उभे राहिले. या आंदोलनानंतर अनेक नामवंत खेळाडूंनी आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. आता भारताच्या कसोटी किक्रेट संघातील मुख्य फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराबद्दलही एक प्रकरण समोर आले आहे. पुजाराचा काउंटी क्रिकेट संघ यॉर्कशायरही सध्या वर्णभेदाच्या आरोपांमध्ये अडकला आहे. या संघाचा माजी कर्णधार अझीम रफिकने त्याच्याबरोबर झालेल्या वर्णभेदाचा खुलासा केला आहे. मी या वर्णभेदाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायचा विचार केला होता, असेही त्याने म्हटले आहे.

वर्णभेदाचा आरोपामध्ये अडकलेल्या यॉर्कशायर काउंटीसंघाविरूद्ध क्रिकेटपटू अझीम रफिकने केलेल्या आरोपाचे समर्थन करताना त्यांच्या माजी कर्मचाऱ्यांने खळबळजनक खुलासा केला आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराला आशियाई असल्यामुळे तसेच त्याचे नाव उच्चारता येत नसल्याने त्याला 'स्टीव्ह' म्हणत असल्याचे त्याने म्हटले आहे. याप्रकरणी वेस्ट इंडिजचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू टिनो बेस्ट आणि पाकिस्तानचे राणा नावेद उल हसन यांनी रफिकच्या आरोपाचे समर्थन करणारे पुरावेदेखील सादर केले आहेत. याप्रकणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आशियाई असलेल्या व्यक्तीला स्टीव्ह म्हटले जात होते. तसेच अनेक युवा खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बसण्यात अडचणी येत होत्या, अशी प्रतिक्रिया यॉर्कशायर क्रिकेट फाउंडेशनसोबत काम केलेल्या ताज बट यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.