ETV Bharat / sports

सुनिल जोशी नवे निवड समिती प्रमुख; BCCI ची घोषणा - Sunil Joshi as chairman of national selection panel

बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

BCCI's Cricket Advisory Committee (CAC) recommends former spinner Sunil Joshi as chairman of national selection panel
सुनिल जोशी नवे निवड समिती प्रमुख; BCCI ची घोषणा
author img

By

Published : Mar 4, 2020, 5:54 PM IST

Updated : Mar 4, 2020, 7:56 PM IST

मुंबई - बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. निवड समितीच्या प्रमुखपदासाठी लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरविंदर सिंह, वेंकटेश प्रसाद आणि सुनिल जोशी या पाच जणांच्या मुलाखती मुंबईत झाल्या. यानंतर मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता. यामुळे निवड समितीच्या प्रमुख पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन यासारखे उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. पण यात सुनिल जोशी यांनी बाजी मारली. निवड समितीमध्ये हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.

  • Former India medium pacer Harvinder Singh recommended for place in national selection panel by BCCI's Cricket Advisory Committee (CAC)

    — Press Trust of India (@PTI_News) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुनिल जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड करेल. दरम्यान, सुनिल जोशी यांनी १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. याशिवाय त्यांनी १६० प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मधील १६३ सामने खेळले आहेत.

हेही वाचा - तमीम इक्बालचा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच बांगलादेशी

हेही वाचा - Women's T२० WC : भारत-इंग्लंड उपांत्य झुंज, जाणून घ्या हवामान अंदाज अन् बरचं काही...

Last Updated : Mar 4, 2020, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.