नवी दिल्ली - आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी रोहित शर्माला संघात स्थान न मिळाल्यामुळे निवड समितीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहितच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीचे कारण सांगून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेसाठी निवड केलेल्या तिन्ही संघातून रोहितला वगळले आहे. आता बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रविवारी रोहित शर्माच्या तंदुरूस्तीचे मूल्यांकन करेल.
-
IPL 13: BCCI medical team to assess Rohit Sharma's fitness on Sunday
— ANI Digital (@ani_digital) October 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/3VQBHelAmn pic.twitter.com/p4XSAEBanc
">IPL 13: BCCI medical team to assess Rohit Sharma's fitness on Sunday
— ANI Digital (@ani_digital) October 31, 2020
Read @ANI Story | https://t.co/3VQBHelAmn pic.twitter.com/p4XSAEBancIPL 13: BCCI medical team to assess Rohit Sharma's fitness on Sunday
— ANI Digital (@ani_digital) October 31, 2020
Read @ANI Story | https://t.co/3VQBHelAmn pic.twitter.com/p4XSAEBanc
एका वृत्तानुसार, रोहितच्या तंदुरुस्तीबाबत वैद्यकीय पथक निर्णय घेईल. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की "उद्या रविवारी (१ नोव्हेंबर) रोहितच्या दुखापतीची माहिती घेतली जाईल आणि ऑस्ट्रेलियाला त्याचे जाणे योग्य आहे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल."
''जेव्हा एखाद्याला हॅमस्ट्रिंग दुखापत होते आणि जर ती ग्रेड दोनची दुखापत नसेल, तर तुम्हाला चालताना किंवा सामान्य शॉट्स खेळण्यात काहीच अडचण येत नाही. पण वेगवान धाव घेणे किंवा विकेट्स दरम्यान धावणे ही खरी समस्या आहे", असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा -
२०१८-१९मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला दौरा केला होता, तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम राखली होती. यंदा ऑस्ट्रेलिया दौर्यावर, भारताला २७ नोव्हेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ या कालावधीत तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.