मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या टी-२० चॅलेंज लीग स्पर्धेसाठी तीन संघांची घोषणा केली आहे. या संघांचे नेतृत्व मिताली राज, स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मिताली वेलोसिटी, स्मृती ट्रेलब्लेझर्स व हरमनप्रीत सुपरनोवास या संघांचे नेतृत्त्व करणार आहे. ही स्पर्धा ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान युएईमध्ये खेळवली जाणार आहे.
महिलांच्या या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील खेळाडूंचाही समावेश असणार आहे. तसेच टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत थायलंडकडून पहिले अर्धशतक झळकावणारी नाथ्थाकन चानथाम ही खेळाडू देखील चॅलेंज स्पर्धेतील आर्कषण असणार आहे. स्पर्धेतील तिन्ही संघांची निवड भारताच्या महिला निवड समितीने केली आहे.
सुपरनोवासचा संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पूनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकार, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर्सचा संघ -
स्मृती मंधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ॠचा घोष, हेमलता, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झूलन गोस्वामी, सिम्रन दिल बहादूर, सलमी खातून, सोफी, चानथाम, डिएंट्रा डॉटीन आणि केशवी गौतम.
वेलोसिटीचा संघ -
मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिब्यादर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डॅनियल वॅट, सुन लुस, जहांआरा आलम आणि एम. अनागा.
स्पर्धेचे वेळापत्रक -
- ४ नोव्हेंबर - सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी
- ५ नोव्हेंबर - वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स
- ७ नोव्हेंबर - ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज
- ९ नोव्हेंबर - अंतिम सामना
महिला टी-२० चॅलेंज लीग स्पर्धेतील तीन सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होतील. तसेच स्पर्धेतील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल.