ऑकलंड - बांग्लादेश संघाचा न्यूझीलंड दौरा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार, बांग्लादेशचा संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्याला १३ मार्चपासून सुरूवात होणार होती. पण आता हा दौरा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात सांगितले की, 'कोरोनामुळे उद्भवलेली सद्यपरिस्थिती आणि पाहुण्या संघाच्या तयारीसाठी मुबलक वेळ मिळावा, यासाठी हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. नियोजित कार्यक्रमाच्या वेळेपेक्षा या दौऱ्याला सात दिवसांनंतर सुरूवात होईल.'
-
There are new dates for our ODI and T20 series with @BCBtigers. The changes mean there are now more double-headers this summer with the @WHITE_FERNS! Details | https://t.co/sVy6NwKqIE #NZvBAN #NZvAUS pic.twitter.com/dQqJgKAufx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">There are new dates for our ODI and T20 series with @BCBtigers. The changes mean there are now more double-headers this summer with the @WHITE_FERNS! Details | https://t.co/sVy6NwKqIE #NZvBAN #NZvAUS pic.twitter.com/dQqJgKAufx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2021There are new dates for our ODI and T20 series with @BCBtigers. The changes mean there are now more double-headers this summer with the @WHITE_FERNS! Details | https://t.co/sVy6NwKqIE #NZvBAN #NZvAUS pic.twitter.com/dQqJgKAufx
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 3, 2021
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, उभय संघातील एकदिवसीय मालिकेला २० मार्चपासून सुरूवात होणार आहे. तर टी-२० मालिका २८ मार्चपासून खेळली जाईल.
दरम्यान, बांग्लादेशचा संघ २०१९ नंतर प्रथमच न्यूझीलंड दौरा करणार आहे. २०१९ मध्ये ख्राइस्टचर्च येथे तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एका मशिदमध्ये हल्ला झाला होता. यानंतर उभय संघातील दौरा अर्ध्यातून रद्द करण्यात आला होता.
हेही वाचा - IND vs ENG: अजिंक्य रहाणेची संघनिष्ठा; कर्णधार विराटबद्दल म्हणाला...
हेही वाचा - Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर