चेन्नई - लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेल, पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा भारताचा सहावा स्पिनर ठरला आहे. अक्षर पटेलने एम. ए. चिदंमबरम स्टेडियममध्ये पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला. त्याने दुसऱ्या डावात ६० धावा देत पाच विकेट घेतल्या.
भारताकडून आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या स्पिनरच्या यादीत, पहिल्या स्थानावर वीवी कुमार हे आहेत. त्यांनी १९६०-६१ या साली दिल्लीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ६४ धावांत ५ विकेट घेतल्या होत्या. यानंतर दिलीप दोशी यांनी १९७९-८० या साली चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हा कारनामा केला होता. त्यांनी १०३ धावांत ६ गडी टिपले होते.
नरेंद्र हरवानी यांनी १९८७-८८ साली चेन्नईत वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ६१ धावांत ८ गडी बाद केले होते. त्यानंतर त्याच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी ७५ धावांत ८ गडी बाद करण्याचा विक्रम केला. यानंतर या यादीत अमित मिश्राचे नाव आहे. त्याने २००८-०९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात ही किमया साधली होती. त्याने ४७ धावांत ६ गडी बाद केले होते.
भारताचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन देखील या यादीत आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. २०११-१२ या साली दिल्ली येथे वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनने ४७ धावांत ६ गडी टिपले होते. आता अक्षर पटेलने ६० धावा देत ५ गडी बाद केले आहेत.
हेही वाचा - WTC : टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावर झेप, इंग्लंडची मोठी घसरण
हेही वाचा - पराभवाचा वचपा..! भारताचा इंग्लंडवर ३१७ धावांनी दणदणीत विजय