सिडनी - भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सद्या बुश फायर रिलीफ सामन्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याला ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीने एक षटक फलंदाजी करण्याची विनंती केली. तेव्हा तो पुन्हा हातात बॅट घेऊन मैदानात उतरला. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकदरम्यान सचिनने एलिसच्या गोलंदाजीचा सामना केला. त्याने तिच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.
-
Sachin is off the mark with a boundary!https://t.co/HgP8Vhnk9s #BigAppeal pic.twitter.com/4ZJNQoQ1iQ
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sachin is off the mark with a boundary!https://t.co/HgP8Vhnk9s #BigAppeal pic.twitter.com/4ZJNQoQ1iQ
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2020Sachin is off the mark with a boundary!https://t.co/HgP8Vhnk9s #BigAppeal pic.twitter.com/4ZJNQoQ1iQ
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2020
एलिस पेरीने एका व्हिडिओव्दारे सचिनला एक विनंती केली होती. त्यात ती म्हणते की, 'ऑस्ट्रेलियाच्या पुनर्वसनासाठी तू हातभार लावत आहेस, याचा मला आनंद आहे. तु आयोजित चॅरिटी सामन्यात एका संघाचा प्रशिक्षक आहेस. परंतु तुला पुन्हा फलंदाजी करताना आम्हाला पाहायला आवडेल. त्यामुळे तू चॅरिटी सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये एक षटक खेळशील का ? या एका षटकातूनही आम्ही काही मदत उभी करणार आहे.'
एलिसच्या विनंतीवर सचिनने होकार दर्शवला होता. त्याने यावर सांगितले होते की, 'मला तुझी संकल्पना आवडली. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून लांब राहण्यास सांगितलं आहे, पण तरीही मी पुन्हा मैदानात उतरेन. यातून आपण पुरेसा निधी गोळा करु, अशी आशा आहे.'
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत अनेक प्राणी आणि पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला. या परिस्थितीमधून ऑस्ट्रेलिया सावरू लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी जगभरातून मदत केली जात आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी बुशफायर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाँन्टिंगच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सचिन सांभाळत आहे.