नवी दिल्ली - अॅशेस मालिकेत स्मिथला डोक्याला चेंडू लागल्याची घटना ताजी असताना सीपीएल स्पर्धेत तशीच एक घटना घडली. सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) स्फोटक खेळाडू आंद्रे रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळला. या घटनेमुळे रसेलला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.
हेही वाचा - ख्रिस गेलचा धडाका सुरुच.. टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले २२वे शतक
सीपीएल स्पर्धेत जमैका थलावाज आणि सेंट ल्युसिया ज्यूक्स या संघात सामना सुरू होता. विंडीजचा धडाकेबाज खेळाडू आंद्रे रसेल जमैका थलावाज संघाकडून खेळत होता. जमैका थलावाजचा संघ फलंदाजी करत असताना ही घटनाल घडली. सामन्याच्या १४ व्या षटकात ज्यूक्स संघाचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनचा बाऊन्सर रसेलच्या डोक्यावर जोरात आदळला. हा चेंडू त्याच्या कानाच्या अगदी जवळ लागला. त्यानंतर लगेचच रसेल मैदानावर कोसळला. इतर खेळाडूही लगेच त्याच्या अवतीभोवती जमा झाले. त्यानंतर रसेलला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले.
-
#AndreRussell Suffers Brutal Blow During #Jamaica Tallawahs vs #StLuciaZouks Match #CPL19 pic.twitter.com/UorR4K7BUb
— Neetu Kamal (@imneetukamal) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AndreRussell Suffers Brutal Blow During #Jamaica Tallawahs vs #StLuciaZouks Match #CPL19 pic.twitter.com/UorR4K7BUb
— Neetu Kamal (@imneetukamal) September 13, 2019#AndreRussell Suffers Brutal Blow During #Jamaica Tallawahs vs #StLuciaZouks Match #CPL19 pic.twitter.com/UorR4K7BUb
— Neetu Kamal (@imneetukamal) September 13, 2019
रसेलचे रुग्णालयात स्कॅन करण्यात आले. त्याला कोणतीही गंभीर दुखापत नाही असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. हा सामना रसेलच्या संघाने गमावला. प्रथम फलंदाजी करताना जमैका संघाने ५ बाद १७० धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने ५८ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलने २२ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. ओबे मॅकोय आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी दोन, तर थिसारा परेराने एक विकेट घेतली.
तर, सेंट ल्युसिया ज्यूक्स संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यातच हे लक्ष्य पूर्ण केले. आंद्रे फ्लेचर नाबाद ४७ आणि रहकिम कोर्नवॉल ७५ यांच्या खेळीमुळे संघाला विजय मिळवता आला.