केपटाऊन - इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुट आणि डॉम सिबले यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर, इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाअखेर मजबूत आघाडी घेतली. इंग्लंडने या दिवसाअखेर ४ बाद २१८ धावा केल्या. त्यांच्याकडे आता पहिल्या डावाची मिळून एकूण २६४ धावांची आघाडी झाली आहे. आफ्रिकेविरूद्धच्या डावात जेम्स अँडरसनने ४० धावांत ५ गडी बाद करत भारताच्या रविचंद्रन अश्विनला मागे टाकले.
-
A new England record 28th Test five-fer for @jimmy9!! 🖐
— England Cricket (@englandcricket) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What's your message to him? 🐐
Scorecard: https://t.co/LkG6DzzbQq#SAvENG pic.twitter.com/Sj2GWeb1gH
">A new England record 28th Test five-fer for @jimmy9!! 🖐
— England Cricket (@englandcricket) January 5, 2020
What's your message to him? 🐐
Scorecard: https://t.co/LkG6DzzbQq#SAvENG pic.twitter.com/Sj2GWeb1gHA new England record 28th Test five-fer for @jimmy9!! 🖐
— England Cricket (@englandcricket) January 5, 2020
What's your message to him? 🐐
Scorecard: https://t.co/LkG6DzzbQq#SAvENG pic.twitter.com/Sj2GWeb1gH
हेही वाचा - बेन स्टोक्सने तब्बल १००० कसोटी सामन्यानंतर रचला अनोखा विक्रम
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने तब्बल २८ वेळा ५ गडी बाद करण्याची किमया केली आहे. भारताचा फिरकीपटू अश्विन आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम यांनी प्रत्तेकी २७ वेळा अशी कामगिरी नोंदवली होती. एक डावात सर्वाधिक वेळा बळींचे पंचक पटकावण्यामध्ये ३७ वर्षीय अँडरसनचा आठवा क्रमांक लागतो.
श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर कसोटी सामन्यात ६७ डावांमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (३७), न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली (३६), भारताचा अनिल कुंबळे (३५), श्रीलंकेचा रंगना हेराथ (३४) आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२९) यांचा समावेश आहे.