नवी दिल्ली : सध्या श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दोन संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 मार्चपासून सुरु होणार आहे. हा सामना विराट कोहलीचा 100 कसोटी सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे. त्यामुळे मोहाली येथील स्टेडियमवर एकून आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी ( BCCI allows spectator attendance ) दिल्याने विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना संस्मरणीय होणार आहे. त्याचबरोबर विराट कोहली 100 कसोटी खेळणारा भारताचा 12 खेळाडू ठरणार आहे. या अगोदर भारताच्या अकरा खेळाडूंनी 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे भारतीय खेळाडू -
सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावस्कर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), इशांत शर्मा (113). (105), हरभजन सिंग (103) आणि वीरेंद्र सेहवाग (103), कोहली 100 कसोटी खेळणारा 12वा भारतीय ठरेल.
अशा परिस्थितीत, बीसीसीआयचा निर्णय त्या प्रेक्षकांसाठी स्वागतार्ह बातमी आहे, ज्यांना स्टँडवरून कोहलीचा 100 वा कसोटी पाहण्याची संधी मिळेल. पहिल्या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी न दिल्याने चाहत्यांच्या एका वर्गाने सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली होती. कारण विशेष म्हणजे, पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) ने गेल्या आठवड्यात पुष्टी केली होती की, कोविड-19 साथीच्या रोगामुळे मोहालीतील पहिली कसोटी प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल.
बुधवारपासून ऑनलाइन तिकिटांची विक्री ( Online ticket sales from Wednesday ) -
पीसीए कोषाध्यक्ष आरपी सिंगला यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्हाला बीसीसीआय कडून मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के क्षमतेच्या प्रेक्षकांना परवानगी ( BCCI allows 50 percent crowd ) देण्यात यावी याबाबत ऐकले आहे. त्यामुळे आम्ही बुधवारपासून ऑनलाइन तिकिटांच्या विक्रीला परवानगी देऊ. कारण येथे सुद्धा खुप गर्दी होते.
कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या 7962 धावाव Virat Test runs ) -
विराट कोहलीला 100 वा कसोटी सामना खेळताना पाहण्यासाठी चाहते स्टेडियममधील तिकीट काउंटरवर उपस्थित राहतील आणि पीसीए हे सुनिश्चित करेल की सर्व COVID-19 प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. 2011 मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या कोहलीने 99 लाल-बॉल सामन्यांमध्ये 7962 धावा केल्या आहेत.