ETV Bharat / sports

Pak vs Aus Test series : पहिली कसोटी अनिर्णीत, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला निकालाची अपेक्षा - पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया

रावळपिंडीतील ऐतिहासिक कसोटीत ( Historic Rawalpindi Test match ) पाच दिवसांत फक्त 14 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी चांगली तयार खेळपट्टी मिळेल अशी खेळाडूंना अपेक्षा आहे. दुस-या कसोटी सामन्यात पाच दिवसीय क्रिकेटसाठी अधिक अनुकूल खेळपट्टी असल्याने, दोन्ही संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याचा प्रयत्न करतील.

Aus
Aus
author img

By

Published : Mar 11, 2022, 3:16 PM IST

कराची: सध्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan v Australia ) संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णाीत पार पडला आहे. तसेच आता या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी सुरु होणार आहे. या अगोदर रावळपिंडीतील खराब सलामीच्या कसोटीनंतर, आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनीही खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' रेट दिले आहे. ऐतिहासिक मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघात काही बदल केले जाऊ शकतात.

रावळपिंडीतील ऐतिहासिक कसोटीत ( Historic Rawalpindi Test match ) सामन्यात पाच दिवसांत फक्त 14 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना चांगली खेळपट्टी मिळेल, अशी आशा आहे. दुस-या कसोटीपर्यंत पाच दिवसीय क्रिकेटसाठी अधिक अनुकूल खेळपट्टी असल्याने, दोन्ही संघ चांगले निकाल लावण्यासाठी आपल्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याचा प्रयत्न करतील.

हसन अली, हरिस रौफ आणि अष्टपैलू फहीम अश्रफ यांच्यासोबत पाकिस्तान त्यांच्या वेगवान आक्रमणात फेरबदल करू शकतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला परिस्थितीनुसार दुसरा फिरकी गोलंदाज जोडण्याची अपेक्षा आहे.

इतिहास सांगतो की या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करणे कठीण असणार आहे. कारण यजमानांनी नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 43 कसोटी सामन्यांपैकी केवळ 23 सामने जिंकले आहेत आणि फक्त दोन गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आयोजन स्थळावर खराब रिकॉर्ड आहे आणि या मैदानावर आठ प्रयत्नांत एकही कसोटी जिंकता आलेली नाही. आयसीसीनुसार, ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्टँडिंगमध्ये 77.77 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल आहे. त्याचबरोबर पाकिस्तान 66.66 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

जवळपास 24 वर्षांपूर्वी याच मैदानावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळच्या 18 वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पहिले पाच बळी घेतले होते.

पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा ( PCB President Ramiz Raja ) म्हणाले, मला आशा आहे की, पुढे जाऊन ही मालिका अधिक रंजक होईल, आता फक्त एकच सामना झाला आहे. त्यामुळे घाई करू नका, अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ( Australia captain Pat Cummins ) म्हणाला, "आमची समज कदाचित कराची आणि लाहोर (दोन फिरकीपटू) साठी योग्य आहे. आम्ही पहिल्या विकेटवर एक नजर टाकू. दोन फिरकीपटू खेळणे येथे उपयुक्त ठरू शकते. परंतु मला वाटत नाही की त्यात फार फरक पडेल.

पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, अझहर अली, फवाद आलम, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद वसीम, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि जाहिद महमूद

ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टेकेट, मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.