ETV Bharat / sports

BWF World Tour Finals: सिंधूचा पहिल्याच सामन्यात पराभव, यामागुचीने दिला धक्का - बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर 2019

बुधवारी झालेल्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिने सिंधूचा १८-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. सिंधूने पहिला गेम जिंकला. मात्र, सिंधूने पुढचे दोन गेम गमावले. यामागुचीने हा सामना ६८ मिनिटांत जिंकला. यामागुचीविरुद्ध सिंधूचा हा सातवा पराभव आहे, तर १० वेळा सिंधूला तिच्याविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे.

World Tour Finals
BWF World Tour Finals: सिंधूचा पहिल्याच सामन्यात पराभव, यामागुचीने दिला धक्का
author img

By

Published : Dec 12, 2019, 1:32 PM IST

ग्वांगजो - बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या पहिल्या फेरीत भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पराभव झाला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सिंधू झगडत आहे. पण, बीडब्ल्यूएफ स्पर्धेमध्ये तिला पहिल्याच सामन्यात पराभव पत्कारावा लागला.

बुधवारी झालेल्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिने सिंधूचा १८-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. सिंधूने पहिला गेम जिंकला. मात्र, सिंधूने पुढचे दोन गेम गमावले. यामागुचीने हा सामना ६८ मिनिटांत जिंकला. यामागुचीविरुद्ध सिंधूचा हा सातवा पराभव आहे, तर १० वेळा सिंधूला तिच्याविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे.

पहिल्या हाफमध्ये सिंधूने चांगला खेळ केला. त्यानंतर, दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूकडे सुरुवातीला ११-६ अशी आघाडी होती. पण ब्रेकनंतर यामागुचीने आक्रमक खेळ करत १५-१५ अशी बरोबरी केली. त्यानंतर यामागुचीने सिंधूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. तिसर्‍या गेममध्येही तिनेही लय कायम राखली आणि सिंधूच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत तिने सामना जिंकला. दरम्यान, सिंधूचा सामना आता चीनच्या चेन यु फेईशी होईल.

ऑगस्ट महिन्यात बॅसेल येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सिंधूने कारकीर्दीतील सर्वोत्तम यश मिळवताना विजेतेपदाला गवसणी घातली. परंतु त्यानंतर तिची कामगिरी ढासळली. कोरिया आणि फुझोऊ चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धामध्ये ती पहिल्याच फेरीत गारद झाली, तर चायना, डेन्मार्क आणि हाँगकाँग खुल्या स्पर्धामध्ये तिने दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळला. फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल, हीच तिची जगज्जेतेपदानंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरची गटवारी

  • अ-गट : पी. व्ही. सिंधू (भारत), चेन यू फेई (चीन), ही बिंग जियाओ (चीन), अकानी यामागुची (जपान)
  • ब-गट : ताय झू यिंग (चायनीज तैपेई), रॅटचानोक इन्टॅनॉन (थायलंड), बुसानन ओंगबॅमरंगफा (थायलंड), नोझोमी ओकुहारा (जपान)

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.