ETV Bharat / sports

थायलंड ओपन : पी.व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत गारद - पी. व्ही. सिंधू लेटेस्ट न्यूज

सिंधुला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. ७४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूचा डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डने २१-१६, २४-२६, १३-२१ असा पराभव केला.

Thailand Open: PV Sindhu loses to Mia Blichfeldt, makes first-round exit
पी. व्ही. सिंधू
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:40 PM IST

थायलंड - भारताची अव्वल महिला शटलर पी.व्ही. सिंधू थायलंड ओपनच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे सिंधुला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. ७४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूचा डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डने २१-१६, २४-२६, १३-२१ असा पराभव केला.

सिंधूने पहिला सेट जिंकला पण त्यानंतर ब्लिचफेल्डने जबरदस्त पुनरागमन करत सिंधुला पराभूत केले. तत्पूर्वी सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी थायलंड ओपनच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत सात्विक आणि पोनप्पाने इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमानुएल विदजाचा २१-११, २७-२९, २१-१६ असा पराभव केला. हा सामना एका तास आणि १२ मिनिटे रंगला होता.

पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना चीनच्या चांग टाक चेंग आणि नाग विंग युंगशी होईल. या फेरीत विजय झाल्यास भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरी गाठेल. दरम्यान, भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय कोरोनामुळे ओपन स्पर्धेतून बाहेर पडले आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियानेही याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा - ‘वीरूष्का’ कडे, चिमुकल्या पावलांनी ‘लक्ष्मी आली घरा’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.