ETV Bharat / sitara

'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची लवकरच होणार घोषणा

author img

By

Published : Nov 12, 2020, 7:14 PM IST

अ‍ॅमेझॉनवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच मिर्झापूर हा भारतातला सर्वाधिक पाहिलेला शो बनला होता. मालिकेचा दुसरा सीझनही यशस्वी झाल्यानंतर प्राइम व्हिडिओने आपला तिसरा सीझनही येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Mirzapur'
'मिर्झापूर'

मुंबई - अ‍ॅमेझॉनची ओरिजनल वेब सिरीज 'मिर्झापूर'च्या पहिल्या भागाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर दुसऱ्या भागानेही इतिहास रचला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने गुरुवारी सांगितले की, अ‍ॅमेझॉनवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच मिर्झापूर हा भारतातला सर्वाधिक पाहिलेला शो बनला आहे. मालिकेचा दुसरा सीझनही यशस्वी झाल्यानंतर प्राइम व्हिडिओने आपला तिसरा सीझनही येणार असल्याचे जाहीर केले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा -कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय

'मिर्झापूर' बद्दल लोकांना एक वेगळी क्रेझ दिसली आहे. शोचा दुसरा सीझन केवळ सर्वाधिक पाहिला गेला नाही, तर लाँच झाल्याच्या अवघ्या ४८ तासांच्या आत जास्तीत जास्त दर्शकांनी बिंज वॉच करून एक नवीन बेंचमार्क देखील स्थापित केला.

पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, हर्षिता शेखर गौर, तसेच अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, मनु ऋषी चड्ढा आणि राजेश तैलंग सारख्या दिग्ग्ज कलाकार या शोमध्ये होते.

हेही वाचा -सानिया मिर्झाची नवी इनिंग, मालिकेतून करणार डिजीटल पदार्पण

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडिया इंडियाच्या इंडियन ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या, “अमेझॉनमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या पसंतीला सर्वात अग्रकम देतो.“ मिर्झापूर ”च्या नवीन हंगामाला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद आमच्या बांधिलकी व प्रयत्नांचे उदाहरण आहे. बर्‍याच वर्षांमध्ये प्रेक्षक मिर्झापूरची कथा आणि त्यातील पात्रांशी जोडत आले आहेत. या हंगामासाठी प्रेक्षकांनी शोवर दाखवलेलं प्रेम अभूतपूर्व आहे. हा उत्साहपूर्ण प्रतिसाद आपल्याला अशी सामग्री तयार करण्यास प्रेरणा देतो. आमचे एक्सेल मीडिया आणि करमणूक सहकार्य नेहमीच उत्कृष्ट राहिले आहे आणि आम्ही त्यांच्यासह हे यश शेअर केल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. "

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.