ETV Bharat / sitara

Indian Idol Marathi : ‘इंडियन आयडल मराठी'च्या ऑडिशन्सना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून तुफान प्रतिसाद! - ‘इंडियन आयडल मराठी'च्या ऑडिशन्सना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून तुफान प्रतिसाद

‘इंडियन आयडल’ हा जगप्रसिद्ध सांगीतिक म्युझिक रियायलीटी शो (‘Indian Idol’ music reality show)आता मराठीमध्येसुद्धा (‘Indian Idol’ in Marathi)प्रसारित होतोय. हा कार्यक्रम अनाऊन्स झाल्यापासून त्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला असून त्यातून स्पर्धक गायकांना निवडताना परीक्षकांची तारांबळ उडाली. परंतु ते सर्व खुश आहेत कारण ‘इंडियन आयडल मराठी' (‘Indian Idol Marath)साठी उत्तम स्पर्धक मिळाले आहेत. थोडक्यात 'इंडियन आयडल मराठी' च्या ऑडिशनला मिळालेला (Great response to the audition)प्रतिसाद पाहता असे म्हणता येईल की इथे महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतील आवाज दुमदुमणार आहे.

‘इंडियन आयडल मराठी
‘इंडियन आयडल मराठी
author img

By

Published : Nov 23, 2021, 8:00 PM IST

Updated : Nov 23, 2021, 10:57 PM IST

‘इंडियन आयडल’ हा जगप्रसिद्ध सांगीतिक म्युझिक रियायलीटी शो (‘Indian Idol’ music reality show)आता मराठीमध्येसुद्धा (‘Indian Idol’ in Marathi)प्रसारित होतोय. हा कार्यक्रम अनाऊन्स झाल्यापासून त्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला असून त्यातून स्पर्धक गायकांना निवडताना परीक्षकांची तारांबळ उडाली. परंतु ते सर्व खुश आहेत कारण ‘इंडियन आयडल मराठी' (‘Indian Idol Marath)साठी उत्तम स्पर्धक मिळाले आहेत. थोडक्यात 'इंडियन आयडल मराठी' च्या ऑडिशनला मिळालेला (Great response to the audition)प्रतिसाद पाहता असे म्हणता येईल की इथे महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतील आवाज दुमदुमणार आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.

संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय संगीतकार जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल (Musician duo Ajay-Atul)परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडॉल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. लेखक, कवी वैभव जोशी या शो साठी लिखाण करीत असून अजय अतुल यांना ‘वाजले की बारा’ फेम गायिका बेला शेंडे ऑडिशन्स मधून उत्तम स्पर्धक निवडण्यासाठी मदत करणार आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.

अजय-अतुल यांनी मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव कमवलं. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत. आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे. उत्कृष्ट स्पर्धक, अनुभवी परीक्षक यांना घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास सोनी मराठी वाहिनीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.

‘इंडियन आयडल मराठी
‘इंडियन आयडल मराठी

'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेल्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करीत आहे. २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठीवर हा कार्यक्रम प्रसारित होत आहे.

हेही वाचा - 'ajinkya' Movie : देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित ‘अजिंक्य’ चित्रपटाला Im Dbवर १० पैकी १० रेटिंग्ज!

Last Updated : Nov 23, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.