ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टी कुंद्राकडे आहे, फक्त गाता न येणारा सर्वगुणसंपन्न नवरा!

author img

By

Published : Jun 18, 2021, 12:06 PM IST

सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये टीव्हीवरची सुंदर परीक्षक शिल्पा शेट्टी हिने कुमार सानूकडे एक खास मागणी केली. या गाण्याची विनंती करताना तिने आपला पती राज कुंद्रा याच्याबद्दल एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तिने कुमार सानूला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ गाणे म्हणण्याची विनंती केली, जे राज कुंद्राचे एक अत्यंत आवडते गाणे आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्रा
शिल्पा शेट्टी कुंद्रा

मुंबई - सुपर डान्सर चॅप्टर ४ ची परीक्षक शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते की, ‘माझा नवरा राज सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही.’ यावर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. या वीकएंडच्या भागांमध्ये एक विश बाउलची गंमत असणार आहे. ज्यात शो मधील प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील. टीव्हीवरची सुंदर परीक्षक शिल्पा शेट्टी हिने कुमार सानूकडे एक खास मागणी केली. या गाण्याची विनंती करताना तिने आपला पती राज कुंद्रा याच्याबद्दल एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तिने कुमार सानूला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ गाणे म्हणण्याची विनंती केली, जे राज कुंद्राचे एक अत्यंत आवडते गाणे आहे.

shilpa shetty
shilpa shetty
या वीकएंडला सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये गायक कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे. आणि त्याच्या गाण्यांवर नृत्ये सादर करीत संगीतनृत्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. ९० च्या दशकातील त्याच्या गाजलेल्या गाण्यांवर स्पर्धक डान्स सादर करतील. कुमार सानू देखील आपली काही लोकप्रिय गाणी गुणगुणताना दिसेल आणि सर्वांना भूतकाळात घेऊन जाईल. हा वीकएंड डान्स, संगीत, मस्ती आणि रंजक किश्श्यांनी भरलेला असणार आहे. आवडत्या गाण्याच्या विषयावर बोलताना शिल्पाने सांगितले की, “राज अगदी सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही. माझ्या नवर्‍याने हे गाणे म्हणायला सुरुवात केली. आणि मी हे पुरते ओळखले की, गाणे त्याचे काम नाही. त्यामुळे, मला आशा आहे की, हे गाणे खरे कसे म्हणायला हवे हे तो आज ऐकेल.” हे ऐकल्यावर तिच्यासकट सर्वांचीच हसून हसून पुरेवाट झाली. अतिथी कुमार सानू म्हणाला, “एका रियालिटी शोमध्ये मी ही गाणी पहिल्यांदाच गात आहे.” आपल्या जबरदस्त आवाजाने त्याने सगळ्यांना भारून टाकले आणि शिल्पाची इच्छाही पूर्ण केली. हे गाणे गाऊन झाल्यानंतर कुमार सानू म्हणाला, “मी राज कुंद्राला कधीच भेटलेलो नाही. पण मी त्याला हेच सांगेन की, तो कितीही चांगला किंवा वाईट गायक असला तरी त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा त्याला मदत करण्यास मी तत्पर असेन.” सुपर डान्सर चॅप्टर ४, हा डान्स रियालिटी शो प्रसारित होतो शनि-रवी रात्री ८ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

हेही वाचा - समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.