अमरावती - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या प्रादूर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू'ला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. ही कर्फ्यू म्हणजे बंदी नसून करोनाला हरवण्याची संधी आहे; त्यामुळे अमरावतीकरांनी घरातच राहवे, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूत सहभागी होऊन देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातच रहावे, असे आवाहन केले आहे. मात्र कोरोनाला घाबरून न जाता काळजी घेण्याची सर्वांना आवश्यकता आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही आवाहन केले आहे त्याप्रमाणे सर्वांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घरातच संपूर्ण एक दिवस थांबावे आणि कोरोनाविरोधातील या लढ्यासाठी सहकार्य करावे, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सिनेतारकांचं आव्हान
कोरोनाचा फैलाव वाढत चाललेला आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव सध्या एकामागोमाग रुग्ण वाढत दिसत आहे. त्यामुळे पूर्ण व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासनाकडून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी बाहेर निघू नये तसेच खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामधेच एक मोठा फॅन बेस असलेल्या देशातील सर्व प्रसिद्ध सिनेतारकांनी कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आवाहन केले आहे. मी घरी बसणार आणि कोरोना वायरसला हरवणार, असं सर्व प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री म्हणताहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री यांच्या सोशल साईटवरून प्रसारित करण्यात आलेला आहे.
म्हणूनच जनता कर्फ्यूकडे बंदी म्हणून न बघता संधी म्हणून पाहायची गरज असल्याचेही नवनीत राणा यांनी म्हटलंय. एका व्हिडिओच्या माध्यामातून त्यांन आपली मते जनतेसमोर मांडली आहे. पाहा त्या काय म्हणतात...