ETV Bharat / sitara

मुकेश खन्नांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य; चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया - मुकेश खन्ना वादग्रस्त वक्तव्य न्यूज

ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना शक्तीमान आणि भीष्म पीतामह यांसारख्या व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहेत. या दोन व्यक्तिरेखा साकारल्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र, आता मुकेश खन्ना वादात सापडले आहेत.

Mukesh Khanna
मुकेश खन्ना
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:24 PM IST

हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना वादात सापडले आहेत. महिलांविषयी खन्ना यांनी एका मुलाखतीत वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. खन्ना यांच्यावर टीका करणाऱ्या कमेंट्सचा सोशल मीडियावर जणू काही पूरच आला आहे.

काय म्हणाले खन्ना?

'द फिल्मी चर्चा'ला दिलेल्या एका मुलाखतीत खन्ना म्हणाले की, 'घर सांभाळणे हे महिलांचे काम आहे. महिलांनी बाहेर पडून काम करण्यास सुरुवात केल्यामुळेच मी-टू सारख्या गोष्टी घडत आहेत. महिला स्वत:ला पुरुषांच्या बरोबरीचे समजत आहेत. महिलांच्या काम करण्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. आई घरात नसल्याने मुलांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो.' आताच्या आधुनिक युगात त्यांच्या विचारसरणीला लोक स्वीकारणार नाहीत, असेही खन्ना म्हणाले आहेत.

मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मुकेश यांची मानसिकताच खराब असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे. तर काही लोकांनी त्यांना 'काम शक्तीमानचे आणि विचार किलवीशचे' असे टोमणेही मारले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.