ETV Bharat / sitara

'माझ्या मनात स्त्रियांबद्दल नितांत आदर' - मुकेश खन्ना वादग्रस्त वक्तव्य अपडेट

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. याबाबत खन्ना यांनी आता स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Mukesh Khanna
मुकेश खन्ना
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:26 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. 'मी टू चळवळ' आणि महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खन्ना सध्या चर्चेत आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी खन्ना यांनी एक पत्रक काढत स्पष्टीकरण दिले आहे.

'माझ्या वक्तव्याचा आणि एकूणच त्या व्हिडिओचा उलट अर्थ काढला गेला आहे. महिलांनी काम करूच नये असे मी कधीही म्हणालो नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, माझ्या वक्तव्याला तोडून-मोडून समोर मांडू नका,' असे खन्ना यांनी या पत्रकात म्हटले आहे.

माझ्या मनात स्त्रियांबद्दल नितांत आदर आहे. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदं भूषवण्याव्यतिरिक्त महिला थेट अंतराळातही गेल्या आहेत. त्यांनी त्यांची जागा मिळवली आहे, असेही खन्ना म्हणाले.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले आहेत खन्ना?

'द फिल्मी चर्चा'ला दिलेल्या एका मुलाखतीत खन्ना म्हणाले की, 'घर सांभाळणे हे महिलांचे काम आहे. महिलांनी बाहेर पडून काम करण्यास सुरुवात केल्यामुळेच मी-टू सारख्या गोष्टी घडत आहेत. महिला स्वत:ला पुरुषांच्या बरोबरीचे समजत आहेत. महिलांच्या काम करण्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. आई घरात नसल्याने मुलांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो.' आताच्या आधुनिक युगात त्यांच्या विचारसरणीला लोक स्वीकारणार नाहीत, असेही खन्ना म्हणाले आहेत.

मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मुकेश यांची मानसिकताच खराब असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे. तर काही लोकांनी त्यांना 'काम शक्तीमानचे आणि विचार किलवीशचे' असे टोमणेही मारले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.