मुंबई - 'तांडव'नंतर 'मिर्झापूर' ही वेबसीरिजही वादात अडकली आहे. या वेब सीरिजविरोधात उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून मिर्झापूर पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे.
अंधेरी गुन्हे शाखेत पथक दाखल
मिर्झापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरवरून एक टीम मुंबईत दाखल झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या प्रकरणी तपास केला जाणार असल्याचे यूपी पोलिसांतील एसएचओ बी ए चौरसियांनी सांगितले.
अरविंद चतुर्वेदींच्या तक्रारीवरून एफआयआर
मिर्झापूरमधील अरविंद चतुर्वेदी नामक व्यक्तीने वेब सीरिजविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वेबसीरिजमधून मिर्झापूरचे बदनामीकारक चित्रीकरण केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून रितेश सिधवानी, फरहान अख्तर, भौमिक आणि अमेझॉन प्राईमविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'तांडव'वरून तांडव! चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे