ETV Bharat / sitara

पाहा 'बिग बॉसच्या 13 पर्वातील आलिशान घराचे फोटो - Bigg Boss 13 Luxuriou house photo

बिग बॉसच्या 13 पर्वातील प्रशस्त असलेल्या या लग्झरीयस घराचे फोटो आता पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. हा सिझन थोडा टेढा असेल असे सलमानने अगोदरच स्पष्ट केलंय.

बिग बॉसचे १३ व्या पर्वातील आलिशान घर
author img

By

Published : Sep 23, 2019, 8:24 PM IST

'बिग बॉस 13 या बहुचर्चित पर्वाला सुरूवात होत आहे. नेहमीच बिग बॉस हाऊस औत्सुक्याचा विषय असते. यावेळी बिग बॉसचे घर कसे असेल याचा खुलासा कलर्स वाहिनीच्या ट्विटरवर करण्यात आलाय. प्रशस्त असलेल्या या लग्झरीयस घराचे फोटो आता पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. हा सिझन थोडा टेढा असेल असे सलमानने अगोदरच स्पष्ट केलंय. जे फोटो प्रसिध्द झालेत त्याच्या कॅप्शनमध्ये हिंदीत लिहिलंय, 'यहां होगा सारा ड्रामा और टेढ़ापन क्योंकि यह है बिग बॉस का नया घर....'

Big Boss house
बिग बॉसचे १३ व्या पर्वातील आलिशान घर

'बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक कोण असणार याचा अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र या शोमध्ये सलमान खान होस्ट आहे. यावेळी त्याला एक विशेष पॉवर देण्यात आली आहे. या खास पॉवरनुसार बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यातील स्पर्धकाला तो स्वतः बाहेर काढू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो स्पर्धक खराब कामगिरी करतोय असे सलमानला वाटेल तेव्हा तो त्याला घरातून बाहेर पडण्याचा इशारा देऊ शकतो. दुसरे म्हणजे दुसऱ्या स्पर्धकाला तो बाहेर पडण्यासाठी नॉमिनेटही करु शकतो. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी शक्ती होस्टला मिळाली आहे.

Big Boss house
बिग बॉसचे १३ व्या पर्वातील आलिशान घर

यापूर्वी या शोमध्ये कोण कोण स्पर्धक असतील याची चर्चा मीडियावर भरपूर सुरू होती. त्यानुसार 'बिग बॉस 13' मध्ये यावेळी चंकी पांडे, अंकिता लोखंडे, राजपाल यादव, महिमा चौधरी, पारस छाब्रा, चिराग पासवान, विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, हिमांशु कोहली, झरीन खान, दयानंद शेट्टी, सिद्धार्थ शुक्ला आणि दोबोलिना भट्टाचार्य यांची वर्णी लागू शकते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.