समाज माध्यमांचा वाढता वापर आणि लॉकडाऊन वा जनता कर्फ्यू सारख्या प्रावधानांमुळे लोकांकडे असलेला जास्तीचा वेळ यामुळे सध्या सोशल मीडियावर कुठल्याही गोष्टीवर वाद निर्माण होत आहेत. खरंतर ही माध्यमं लोकांमधील भौगोलिक दुरी कमी करण्यासाठी अस्तित्वात आली होती परंतु उलटेच होताना दिसतेय. गेल्या दोनेक वर्षांत समाज माध्यमांवर निगेटिव्हिटीच जास्त प्रमाणात दिसून येते. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे असे म्हणणारेच समोरच्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणताना दिसताहेत. त्यामुळेच ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेले फिल्मी कलाकार सतत ट्रोल होताना दिसतात.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणात उलथापालथ झालीय. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय समाजात दोन गट पडल्यासारखे दिसून येते. एक गट जो मोदींना आणि त्यांच्या योजनांना, कार्याला भक्कम पाठिंबा देतो तर दुसरा गट मोदीजी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर जळजळीत टीका करीत असतो. (मोदींचे) भक्त आणि (विरोधी पक्षांचे) चमचे असे हे दोन्ही गट एकमेकांना हिणवत असतात. मनोरंजनसृष्टीतही या दोन्ही गटातील लोकं आहेत आणि मोदींची बाजू घेणाऱ्यांत जेष्ठ अभिनेता अनुपम खेरचे नाव बरेच वरती आहे. त्यांच्या अर्धांगिनी किरण खेर या भाजप कडून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
हे्ही वाचा - ऑस्कर २०२१ : लॉस एंजल्स शहरात रंगतोय ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा