ETV Bharat / sitara

सुशांतच्या कुटुंबात भांडण होऊ नये म्हणून रिया त्याच्या घरी थांबत नव्हती; स्मिता पारीखचा खुलासा - smita parikh news

सुशांतचे कुटुंबीय त्याला भेटायला त्याच्या घरी येत होते. त्या त्या वेळी रिया चक्रवर्ती त्याच्या घरी थांबत नव्हती. सुशांतच्या घरातल्या कुटुंबियांसमोर आली तर नेहमी प्रमाणे भांडण होईल, आणि हे भांडण टाळण्यासाठी त्याच्या घरात थांबत नसल्याचे रियाने सांगितले होते, असे स्मिता पारीखने म्हटले.

Sushant Singh Rajput
सुशांतसिंह राजपूत
author img

By

Published : Aug 6, 2020, 11:03 AM IST

मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची मैत्रीण स्मिता पारीख हिने काही खुलासे केले आहेत. स्मिता पारीख हिच्या म्हणण्यानुसार रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी राहत होती. मात्र, सुशांतसिंह राजपूतचे कुटुंबीय तिला पसंत करत नव्हते. ज्या ज्या वेळी सुशांतचे कुटुंबीय त्याला भेटायला त्याच्या घरी येत होते. त्या त्या वेळी रिया चक्रवर्ती त्याच्या घरी थांबत नव्हती. सुशांतच्या घरातल्या कुटुंबियांसमोर आली तर नेहमी प्रमाणे भांडण होईल, आणि हे भांडण टाळण्यासाठी त्याच्या घरात थांबत नसल्याचे रियाने सांगितले होते, असे स्मिता पारीखने म्हटले.

सुशांतची बहीण मितू सोबतही मैत्री असल्याचे स्मिता पारीखने सांगितले. ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी मितू ही घरी पोहचली होती. मात्र, तेव्हा सुशांतचा मृतदेह बेडवर पडला होता,असे मितूने स्मिताला सांगितले होते. मात्र, पोलिसांना दिलेला जबाब हा पूर्णपणे वेगळा असून बऱ्याच गोष्टी विसंगत असल्याचे स्मिता पारीख म्हणत आहेत.

सुशांतसिंह राजपूतवर जर बायपोलर डिसऑर्डर , डिप्रेशन चे उपचार सुरू होते तर त्याने या अवस्थेत जानेवारी 2020 मध्ये आणखी एक कंपनी कशी काय स्थापन केली ? कोविडच्या संदर्भात एप्रिल 2020 महिन्यात त्याने एका मोहिमेत त्याने भाग कसा काय घेतला ? असे बरेच प्रश्न निर्माण झाल्याचे स्मिता पारीख हिने म्हटले आहे.

2017 मध्ये एका व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी सुशांतसिंह राजपूतला स्मिता पारीख हिने आमंत्रित केले होते. या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रात आवश्यक बदलांबाबत सुशांतसिंह याने त्याचे विचार प्रकट केले होते. यानंतर सुशांत सोबत मैत्री झाली होती आम्ही मोबाइलवर संपर्कात होतो, असे स्मिता पारीख हिने म्हटले आहे. रिया चक्रवर्ती हिच्या सोबतही मैत्री झाली होती. रिया सोबतची पाहिली भेट ही सुशांतच्या घरी झाली होती, असे स्मिताने सांगितले. ऑगस्ट 2019 पर्यंत सुशांतसिंह राजपूत सोबत संपर्क होता, त्यानंतर संपर्क कमी झाल्याचे स्मिताने सांगितले.

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबातील सदस्य हे रिया चक्रवर्ती हिला पसंत करत नव्हते , तर दुसरीकडे सुशांत त्याच्या निर्णयावर ठाम होता. सुशांत आपले ऐकत नसल्याचे पाहत काही वेळा सुशांत व त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे खटके उडत असल्याचे समोर येत आहे. मात्र, सुशांतच्या निर्णयाला होकार देत त्याचे कुटुंबीय रिया चक्रवर्ती सोबत सुशांतचे लग्न लावून देण्यास शेवटी तयार झाले होते. मात्र, या दरम्यानच सुशांत याने 14 जून रोजी आत्महत्या केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.