कॅप्टन मार्वलच्या नव्या सुपरहिरोच्या दमदार एन्ट्रीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. अॅव्हेन्जर्समध्ये कॅप्टन मार्वल हा सर्वात ताकदवान आणि सुपरपॉवर असणारा सुपरहिरो असल्याचे मानले जात आहे. महिला सुपरहिरोला पडद्यावर पाहून प्रेक्षक टाळ्या वजवताना स्वतःला रोखू शकत नाहीत. हॉलिवूड अभिनेत्री ब्री लार्सनने कॅप्टन मार्वलच्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे.
कॅप्टन मार्वलची कथा नंतर सुरु होते. क्री नावाच्या स्पेसक्राफ्टमध्ये कॅरोल डेनवर्स नावाची पॉवर वुमन असते. तिच्याकडे अशी काही शक्ती आहे की तिने ती ओळखलेली नाही. या स्पेसक्राफ्टमध्ये तिला वीर्स नावाने बोलवले जाते, यामागेही एक ट्विस्ट आहे. कॅरोलच्या हातात आगीचा गोळा फेकण्याची शक्ती असते. असे असले तरी या शक्तीचा ती वापर करीत नसते. तिच्या स्वप्नामध्ये फाईटर प्लेनची पायलट असलेली डॉक्टर लार्सन येते.
स्क्रल्स (Skrulls) नावाच्या स्पेसशिप लढाईत कॅरोलला कैद होते, स्क्रल्सच्या प्रमुखाला तिच्या डोक्यातील माहिती जाणून घ्यायची असते. त्यानंतर ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि थेट जमिनीवर पडते. ती जिथे पडते त्याला क्री स्पेसक्राफ्टचे लोक 'C-53' ग्रह म्हणत असतात. इथे तिच्या जीवनातील काही किस्से दडलेले असतात. इथे ती १९९५ मध्ये पोहोचते आणि तिला ६ वर्षापूर्वीचे म्हणजेच १९८९ मधील घडलेल्या घटना आठवायला सांगितल्या जातात, परंतु तिला काही आठवत नसते. यानंतर कॅरोल कशी कॅप्टन मार्वल बनते हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
कॅप्टन मार्वलचा जन्म कसा होतो, तिला शक्ती कशी मिळते याची गोष्ट फारसी नवी नाही. अगोदरचे अॅव्हेंजरस बाबतीत जे घडले तेच इथे घडते. सिनेमाचा पहिला भाग कॅरेक्टर्स एस्टाब्लिश करण्यात जातो आणि कथानक फिके पडत जाते. दुसऱ्या भागात काही अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात, यात कॅप्टन मार्वलची असली पॉवर पाहायला मिळते. आजपासून २५ वर्षापूर्वीच्या गोष्टीत कॅप्टन मार्वलला निक फ्यूरी साथ देत आलाय आणि शेवटपर्यंत तो साथ देत राहतो. या सर्व प्रकारात कथा संथ होत जाते.
तुम्ही जर अॅव्हेंजर्सचे फॅन असाल तरच तुम्हाला हा चित्रपट आवडू शकेल.