ETV Bharat / sitara

अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल

author img

By

Published : Mar 6, 2021, 6:22 PM IST

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचना लाटकर यांना देण्यात यावा अशी मागणी लेखक दिग्दर्शक उज्वल ठेंगडी यांनी केली आहे. यासाठी देशभर मोहीम सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. सरकारने राजकारण न करता त्यांना हा पुरस्कार जाहीर करावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Sulochana Latkar
सुलोचना लाटकर

नागपूर - चित्रपट सृष्टीत महाराष्ट्राला वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या सुलोचना लाटकर या 92 वर्षाच्या अभिनेत्री आहेत. 50 वर्षात अनेक चित्रपट करूनसुद्धा त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास दुर्लक्ष का झाले? असा सवाल लेखक दिग्दर्शक उज्वल ठेंगडी यांनी सरकारला केला आहे. तसेच यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचना लाटकर यांना द्यावा असे म्हणत तीन राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका पाहून पुरस्कार देऊ नये असेही ते म्हणाले.

एखाद्याला किती काळ वाट पाहायला लावायची असा प्रश्न करत ठेंगडी म्हणाले की, दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांनी काळ गाजवला आहे. एखादी भूमिका दाखवा ज्यामध्ये त्यांनी आपले अभिनय कलेचे प्राण ओतले नाहीत. अनेक चित्रपटातून अभिनेत्याच्या आईची भूमिका वटवत वेगळी ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली आहे. तसेच देशातील राष्ट्रापतीच्या हस्ते सर्वाधिक गौरव झालेल्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. असे असताना दादासाहेब फाळके पुरस्कारापासून त्या वंचित असल्याचे पाहून वाईट वाटते, असे ते म्हणाले.

सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची मागणी

हेही वाचा - छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर

दोन वर्षापूर्वी वाटत असताना निराशाच झाली....

अभिनेत्री सुलोचना लाटकर दोन वर्षांपूर्वी 90 वर्षात पदार्पण केले. त्यावर्षी त्यांना अभिनेता महानायक अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक आशिष गोवारीकर, या मंडळींनी घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा वाटले होते यंदातरी त्यांना पुरस्कार मिळेल. पण तसे न झाल्याने निराशाच झाली.

कोवळ्या वयाच्या विचार सरकारने करावा....

देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना प्रश्न आहे की, जेव्हा राष्ट्रपती भवनात बॉलिवूडच्या कलाकारांना दिल्लीत बोलावले जाते, तेव्हा एकही मराठी कलाकार त्यामध्ये का नसतो? शरद पोंक्षे, विक्रम गोखले, अशोक सराफ, सुबोध भावे यांचे नाव कोणाला माहीत नाही का? सरकारला माहीत नाही का? चित्रपटसृष्टी म्हटले की मराठी कलाकारांना स्थान असलेच पाहिजे ते विसरून चालणार नाही.

महिलांचा सन्मान म्हणताना आतापर्यंत केवळ 6 महिला कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कार...

1969 पासून सुरू झालेला दादासाहेब पुरस्कार आतापर्यंत 44 पुरुषांना देण्यात आला आहे. तेच महिलांच्या विचार केल्यास केवळ 6 महिलांचा समावेश आहे. पुरुष प्रधान संस्कृतीकडून महिला प्रधान संस्कृतीकडे वाटचाल करतांना हा सुलोचना लाटकर यांना देऊन नवीन प्रथेला सुरवात करा असे उज्वल ठेंगडी म्हणाले. सोबतच इतर पुरस्कार देताना चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्रीना पुरस्कार दिला जातो. त्याचा प्रमाणे विभाजन करून फाळके पुरस्कार हा महिला आणि पुरुष असे दोन पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही दिग्दर्शक ठेंगडी यांनी केली आहे.

मोहीमेत सहभागी होण्याचेही आवाहन...

यासाठी मोहीमेत केवळ मराठी माणसेच नाही तर देशातील इतर कलाकारही जोडले जातील असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला. पण केरळ, बंगाल, तामिळनाडूमध्ये निवडणूका आहे म्हणून राजकारण करू नका असेही ते म्हणाले. तुम्ही जिंकणार निवडणुका पण आमची अभिनेत्रीही जिंकली पाहिजे अशी साद ही त्यांनी घातली आहे.

हेही वाचा - यावर्षी तरी दादासाहेब फाळके पुरस्कार मराठमोळ्या सुलोचना दीदींना मिळेल का?

काय सांगावे सुलोचनाताई बद्दल त्यातर दैवत आहे....

त्या फक्त माऊली नाहीत तर सोज्वळ आहेत, अभिनय क्षेत्राची जाण असणारी व्यक्ती आहे. त्यांचे गुरू भालजी पेंढारकर पासून अभिनयाची व्यक्तिमत्वाची देणं सुलोचना लाटकर यांना मिळाली आहे. त्याबद्दल काय फारसे बोलायचे? त्या आमचे दैवत आहेत या शब्दात ठेंगडी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कलाकारानी एकत्र येऊन प्रयत्न करावे...

भारतरत्न लता दीदी, सचिन तेंडुलकर, बॉलिबुडचे महानायक अमिताभ बच्चन, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, हेमामालिनी, या मंडळींनी पुढाकार घेऊन पंतप्रधान आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांना गळ घालून सुलोचना दीदी यांना 2019 अथवा 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन महाराष्ट्राचा कणा ताठ ठेवावा. तीन राज्यातील निवडणुका होत आहेत. पण महाराष्ट्रात सुद्धा निवडणुका होणार आहे हे विसरू नका असेही ते म्हणाले.

दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तरी काय....

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या नावाने 1969 पासून म्हणजेच जन्मशताब्दी वर्षपासून सुरू करण्यात आला. चित्रपट सृष्टीत उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला जातो. अलीकडच्या काळात शशी कपूर, मनोज कुमार, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन यांना दिला आहे. तेच महिलांमध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना देण्यात आला आहे.

सुलोचना लाटकर यांचे चित्रपट जग....

सुलोचना लाटकर यांनी 1943 पासून भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक असे अनेक चित्रपटातून ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीत आईच्या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली. त्यांना चित्रभूषण आणि महाराष्ट्र भूषन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अब दिल्ली दूर नही, कटी पतंग, संपूर्ण रामायण, मराठा तितुका मेळवावा अशा अनके चित्रपटात त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

हेही वाचा - LIVE : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.