ETV Bharat / sitara

सस्पेन्स, थ्रिलरने भरलेला 'विक्की वेलिंगकर'चा ट्रेलर लॉन्च

author img

By

Published : Nov 22, 2019, 2:25 PM IST

मराठी चित्रपटांमध्ये सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर अनेकदा वापरण्यात आला आहे. मात्र, तरीही या सिनेप्रकाराला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटातून करण्यात आलाय.

'विक्की वेलिंगकर'चा ट्रेलर लॉन्च

मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. मुंबईमध्ये हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

मराठी चित्रपटांमध्ये सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर अनेकदा वापरण्यात आला आहे. मात्र, तरीही या सिनेप्रकाराला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटातून करण्यात आलाय. या चित्रपटात सोनाली ही 'विक्की वेलिंगकर'च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तिने कशी मेहनत घेतली, हे तिनं यावेळी सांगितलं.

सस्पेन्स, थ्रिलरने भरलेला 'विक्की वेलिंगकर'चा ट्रेलर लॉन्च

हेही वाचा -मुलांच्या मनोरंजनासाठी ईफ्फी परिसरात आकर्षक 'चिल्ड्रन व्हिलेज'

अभिनेत्री स्पृहा जोशीची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. या दोघांशिवाय संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढ व्यक्तिरेखेशी विक्कीचा कशाप्रकारे सामना होतो, आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत ती खंबीरपणे कशी उभी राहते यांची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट या सिनेमात आपल्याला पहायला मिळणार आहे. शिवाय 'मास्क मॅन'ची व्यक्तीरेखा पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार असल्यामुळे त्याचं गुपित अजूनही कायम आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सौरभ वर्मा यांचं दिग्दर्शन असलेला विक्की वेलिंगकर हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

हेही वाचा -पाहा, समीर विद्वन्सच्या मल्टी स्टारर राजकीय नाट्याचा 'धुरळा'

Intro:अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर'या सिनेमाचा ट्रेलर आज मुंबईत लॉन्च करण्यात आला. यावेळेस सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

मराठी सिनेमांमध्ये सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर अनेकदा वापरण्यात आला असला तरीही या सिनेप्रकाराला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न 'विक्की वेलिंगकर' या सिनेमाद्वारे करण्यात आला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या सिनेमात विक्की वेलिंगकरच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. सिनेमातून तिचा लुकही काहीसा वेगळा आहे. तर स्पृहा ही तिची मैत्रीण कविताच्या भूमिकेत आहे. या दोघांशिवाय संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

'विक्की वेलिंगकर' ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढ आशा एका व्यक्तिरेखेचा तिच्याशी सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत ती खंबीरपणे कशी उभी राहते यांची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल.

बॉलिवूडमध्ये मिक्की व्हायरस या सिनेमाचं दिग्दर्शन केलेले सौरभ वर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. हा त्यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तर अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशाणदार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचा संपूर्ण ट्रेलर सोनाली सोबत एक अनोळखी 'मास्क मॅन' दिसतो आहे. या मास्क मॅनच गुपित अजूनही कायम आहे. मात्र ते नक्की काय आहे ते तुम्हाला जाणून घायच असेल सहा डिसेंबरला हा सिनेमा तुम्हाला पाहायलाच हवा.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.