ETV Bharat / sitara

अजय देवगण चा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीत! - kajol

सध्या लॉकडाऊन लागलेला असून अनेकांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनी सरसावली असून ‘लॉकडाऊन’ मध्ये मनोरंजनाचा डबल धमाका देण्याचे वचन दिले आहे. अजय देवगण चा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीत पाहण्याची संधी त्यांनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

तान्हाजी चित्रपट आता मराठीतही
तान्हाजी चित्रपट आता मराठीतही
author img

By

Published : Apr 18, 2021, 12:32 PM IST

मुंबई - सध्या लॉकडाऊन लागलेला असून अनेकांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनी सरसावली असून ‘लॉकडाऊन’ मध्ये मनोरंजनाचा डबल धमाका देण्याचे वचन दिले आहे. अजय देवगणचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ आता मराठीत पाहण्याची संधी त्यांनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मराठीत पाहा तान्हाजी
मराठीत पाहा तान्हाजी
अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’येत्या २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमाचा मराठीतून प्रसारित होणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.