जालना - सध्या देशभरात 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची लाट पाहायला मिलत आहे. या चित्रपटातून शिवरायांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळाली आहे. अभिनेता अजय देवगन याने तानाजींची भूमिका साकारली आहे. तर, चुलत्याच्या भूमिकेत अभिनेता कैलास वाघमारे हे दिसले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करत त्यांचा भोकरदन येथे चाहत्यांच्या वतीने सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले आहे.
कैलास वाघमारे हे भोकरदन तालुक्यातील चांधई ठोंबरे येथील गरीब कुटुंबातील अभिनेते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध नाटक, मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहे. 'तान्हाजी' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना हिंदी चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अजय देवगन आणि सैफ अली खानसोबत त्यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करुन सत्कार केला.
हेही वाचा -शिल्पा शेट्टीची कुटुंबीयांसोबत साईदरबारी हजेरी
दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कैलास यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि निर्मला दानवे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी कैलास आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांचा सत्कार केला.
हेही वाचा -'जो तुम ना हो रहेंगे हम नही', चाहत्यांच्या अफाट प्रेमाने भारावला कार्तिक आर्यन