मुंबई - बहुचर्चित 'स्पाइडर-मॅन : नो वे होम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. पहिल्या विकेंडला चार दिवसात एकूण 108. 37 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे.
स्पाइडर-मॅन : नो वे होम' चित्रपटाने पहिल्या दिवशी गुरुवारी 32.67 कोटी, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 20.37 कोटी, तिसऱ्या दिवशी शनिवारी 26. 10 कोटी व चौथ्या दिवशी रविवारी चित्रपटाने 29. 23 कोटीची कमाई केली. अशा प्रकारे पहिल्या चार दिवसाच्या विस्तारित विकेंडला एकूण 138. 55 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे.
-
‘SPIDERMAN’ SETS NEW BENCHMARKS IN INDIA… #SpiderMan: #NoWayHome emerges #SonyIndia’s HIGHEST GROSSING FILM in #India… ALSO, it surpasses *lifetime biz* of #SpiderMan movies [Gross BOC] in just *4 days*… 4-day *extended* weekend: ₹ 138.55 cr [Gross BOC].
— taran adarsh (@taran_adarsh) December 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
contd… pic.twitter.com/BGaMT61JmV
">‘SPIDERMAN’ SETS NEW BENCHMARKS IN INDIA… #SpiderMan: #NoWayHome emerges #SonyIndia’s HIGHEST GROSSING FILM in #India… ALSO, it surpasses *lifetime biz* of #SpiderMan movies [Gross BOC] in just *4 days*… 4-day *extended* weekend: ₹ 138.55 cr [Gross BOC].
— taran adarsh (@taran_adarsh) December 20, 2021
contd… pic.twitter.com/BGaMT61JmV‘SPIDERMAN’ SETS NEW BENCHMARKS IN INDIA… #SpiderMan: #NoWayHome emerges #SonyIndia’s HIGHEST GROSSING FILM in #India… ALSO, it surpasses *lifetime biz* of #SpiderMan movies [Gross BOC] in just *4 days*… 4-day *extended* weekend: ₹ 138.55 cr [Gross BOC].
— taran adarsh (@taran_adarsh) December 20, 2021
contd… pic.twitter.com/BGaMT61JmV
स्पायडर-मॅनची ओळख 2019 च्या 'स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम' चित्रपटाच्या शेवटी उघड झाली होती. स्पायडरमॅन कोण आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पीटर पार्कर (स्पायडर-मॅन) डॉक्टर स्ट्रेंजची मदत घेतो. अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये डॉक्टर स्ट्रेंजची भूमिका केली आहे. डॉक्टर स्ट्रेंजच्या जादूने मल्टीवर्स उघडले आणि 2002 च्या 'स्पायडर-मॅन' खलनायक ग्रीन गोब्लिनसह मागील 'स्पायडर-मॅन' फ्रँचायझीमधील खलनायकांना या विश्वात आणले.
त्यात 2004चा 'स्पायडर-मॅन 2' खलनायक ओट्टो ऑक्टाव्हियस (आल्फ्रेड मोलिना), 'स्पायडर-मॅन 3' खलनायक सँडमॅन (थॉमस हेडन चर्च), 'द अमेझिंग स्पायडर-मॅन' खलनायक लिझार्ड (राइस इफन्स) आणि 2014 'द अमेझिंग स्पायडर-मॅन 2'चा व्हिलन इलेक्ट्रो (जेमी फॉक्स) या चित्रपटात सामील आहे. अभिनेता टोबे मॅग्वायर आणि अँड्र्यू गारफिल्ड देखील 'स्पायडर-मॅन: नो वे होम'मध्ये दिसतात.
या चित्रपटात जेनडिया एमजेच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच नेड लीड्सच्या भूमिकेत जेकब बॅटन आणि आंटी मेच्या भूमिकेत मारिसा टोमी परतले आहेत. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली मार्व्हलचा 'स्पायडरमॅन: नो वे होम' इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत भारतीय सिनेमांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा - Year Ender 2021 : ऐश्वर्या रायपासून शिल्पा शेट्टीपर्यंत कायद्याच्या कचाट्यात अडकलेले कलाकार