ETV Bharat / sitara

‘सदानन्नूनडिपे’च्या रेकॉर्डिंगवेळी भेटले ‘बर्थडे ट्विन्स’ अरमान मलिक-सावनी रवींद्र - song

गायिका सावनी रवींद्र आणि बॉलीवूडचा सुप्रसिध्द गायक अरमान मलिक यांनी नुकतंच ‘सदानन्नू नडिपे’ या तेलगु चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. तेव्हा अरमान मलिक हा सावनी रवींद्रचा 'बर्थडे ट्विन्स' असल्याचा उलगडा सावनीला झाला आणि मग त्यांची भेट अविस्मरणीय झाली.

सावनी रविंद्र आणि अरमान मालिक
author img

By

Published : Jul 4, 2019, 4:57 PM IST

मुंबई - सुरेल गायिका सावनी रवींद्रने तमिळ सिनेसृष्टीत 20 हून अधिक गाणी गायल्यावर आता ती ‘सदानन्नूनडिपे’ मधून पहिल्यांदाच तेलगु सिनेमामध्ये गाणे गायले आहे. या सिनेमात पार्श्वगायनाची संधी कशी मिळाली, याचा किस्सा सावनी सांगते, “नान सोलवा हे गाणे मी संगीतकार शुंभकर शेंबेकर सोबत गायले आहे. हे तमिळ गाणे सदानन्नूनडिपे या तेलगु सिनेमाच्या निर्मात्यांनी ऐकल्यावर त्यांनी शुंभकरला असे एक गाणे या सिनेमासाठीही संगीतबध्द करायचा आग्रह धरला आणि ते गाणेही मी आणि शुभंकरनेच गायला हवे, असाही त्यांचा आग्रह होता.”

अरमान मलिकशी झालेल्या भेटीसोबत सावनी रवींद्र सांगते, “शुभंकर आणि माझ्या डुएट गाण्याशिवायही एक सोलो गाणे या सिनेमासाठी मी गायले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळीच माझी आणि अरमानची भेट झाली. अरमानचेही एक सोलो गाणे यामध्ये आहे. अरमानशी झालेल्या पहिल्याच भेटीत आम्ही खूप गप्पा मारल्या. यावेळी आमचा दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी येत असल्याचे आम्हाला उमगले.”

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.