मनाली - अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचं हे लव्हबर्ड्स पहिल्यांदा पडद्यावर एकत्र झळकणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. पुढच्या चित्रिकरणासाठी चित्रपटाची टीम अलिकडेच मनालीला पोहोचली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन हे देखील पुढील शूटिंगसाठी मनालीला रवाना झाले आहेत. पर्यटनामध्ये मनाली शहराची बॉलिवूडमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळते. दरवर्षी बॉलिवूडचे बरेचसे कलाकार येथे शूटिंगसाठी येत असतात.
२५ नोव्हेंबरपासून 'ब्रम्हास्त्र'चं पुढचं शूटिंग करण्यात येईल. येथे २ आठवड्यांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.