मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आणखी एका नव्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. 'जोगीरा सारा रा रा' असे आगामी चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाचे शुटिंग उत्तर प्रदेशमध्ये सुरू होते.
कोरोनाचा काळ असल्यामुळे या चित्रपटाचे शुटिंग थांबेल असे अनेकांचा कयास होता. मात्र चित्रपटाच्या टीमने सलग शुटिंग करुन अखेर वाराणसीमध्ये पॅक अपची घोषणा केली. लखनौ शहरातून शुटिंगला सुरुवात केल्यानंतर जुन्या वाराणसीमध्ये शुटिंग पूर्ण करण्यात आले.
-
NAWAZUDDIN - NEHA: START-TO-FINISH SHOOT ENDS... Talkie portions of #JogiraSaraRaRa - starring #NawazuddinSiddiqui and #NehaSharma - were completed in #UP... Only songs remain to be filmed... Directed by Kushan Nandy... Produced by Naeem A Siddiqui. pic.twitter.com/LTgKyKwiC6
— taran adarsh (@taran_adarsh) April 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NAWAZUDDIN - NEHA: START-TO-FINISH SHOOT ENDS... Talkie portions of #JogiraSaraRaRa - starring #NawazuddinSiddiqui and #NehaSharma - were completed in #UP... Only songs remain to be filmed... Directed by Kushan Nandy... Produced by Naeem A Siddiqui. pic.twitter.com/LTgKyKwiC6
— taran adarsh (@taran_adarsh) April 7, 2021NAWAZUDDIN - NEHA: START-TO-FINISH SHOOT ENDS... Talkie portions of #JogiraSaraRaRa - starring #NawazuddinSiddiqui and #NehaSharma - were completed in #UP... Only songs remain to be filmed... Directed by Kushan Nandy... Produced by Naeem A Siddiqui. pic.twitter.com/LTgKyKwiC6
— taran adarsh (@taran_adarsh) April 7, 2021
या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत नेहा शर्माची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाची कथा गालिब असदभोपाली यांची आहे. कुशन नंदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून नईम सिद्दीकी याचे निर्माते आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीजकरण्याची योजना आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'जोगीरा सारा रा रा'शुटिंग संपल्याचे ट्विट केले आहे.
हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'चा तेलुगु टिझर पवन कल्याणच्या 'वकिल साब'सोबत होणार रिलीज