ETV Bharat / sitara

सचिन खेडेकर यांनी मानले नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सचे आभार! - सचिन खेडेकर यांनी मानले नीरज पांडेचे आभार

ल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'ताऱ्यांचे बेट' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यालाही सुज्ञ प्रेक्षकांनी पाठिंबा दिला होता. आज त्याचा १०वा वर्धापन दिन आणि अभिनेता सचिन खेडेकर यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर करत, या अप्रतिम कथानकासाठी आणि त्यांना त्याचा भाग बनवण्यासाठी नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

author img

By

Published : Apr 14, 2021, 8:14 PM IST

आशयघन चित्रपटांसाठी मराठी सिनेसृष्टी प्रसिद्ध आहे आणि काही ‘आऊट ऑफ द बॉक्स’ कथाकथनासाठी अमराठी निर्माते-दिग्दर्शक मराठीचीच निवड करतात. मराठी प्रेक्षक चोखंदळ असून तो अनेक चित्रपट-प्रयोगांना पाठिंबा दर्शविताना दिसतो. दहा वर्षांपूर्वी नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'ताऱ्यांचे बेट' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यालाही सुज्ञ प्रेक्षकांनी पाठिंबा दिला होता. आज त्याचा १०वा वर्धापन दिन आणि अभिनेता सचिन खेडेकर यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर करत, या अप्रतिम कथानकासाठी आणि त्यांना त्याचा भाग बनवण्यासाठी नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सामान्य कारकुनाभोवती फिरते. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो.चित्रपटामध्ये दाखवलेल्या मूल्यांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, "पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल."
खेडेकर यांनी सांगितले की असा चित्रपट काळाची गरज आहे. ते म्हणतात, "मला 'ताऱ्यांचे बेट'चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे."सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत यांचे आभार मानले आणि नीरज पांडे यांच्या विषयीही गौरवोद्गार काढले, ते म्हणाले की, "क्रिएटिव्ह निर्माता, नीरज पांडे यांनी खूप मदत केली. त्यांनी या कथेला पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार."या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे, अश्विनी गिरी, अश्मिता जोगळेकर, किशोर कदम, शशांक शिंदे आणि ईशान तांबे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एकता कपूर, शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी ‘ताऱ्यांचे बेट’ ची सहनिर्मिती केली होती. ‘या गौरवशाली दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कलाकार, तंत्रज्ञ, नीरज पांडे, शीतल भाटिया आणि फ्रायडे फिल्मवर्क्स यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा आहे की ते भविष्यातही आम्हाला अशी दुर्मिळ रत्ने देत राहतील’ असे जाता जाता खेडेकर म्हणून गेले. हेही वाचा - आलिया भट्टचा ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘सीता’ लूक आला समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.