मुंबई - कलेला जर संधी मिळाली तर, आपण कुठवरही पोहोचु शकतो हे सिद्ध करणाऱ्या रानू मंडल या सध्या प्रसिद्धी झोतात आहे. रेल्वेस्टेशन ते हिंदी सिनेसृष्टी हा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा असा आहे. एका रात्रीत त्यांचा व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलले. आता हिंदी सिनेसृष्टीसोबत त्यांना मल्याळम इंडस्ट्रीतही गाण्याची ऑफर मिळण्याची चर्चा आहे. त्यांचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रानू मंडल यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका रिअॅलिटी शोमधील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये रानू या मल्याळम गाणं गाताना पाहायला मिळतात. त्यांच्या लूकमध्येही बराच बदल झालेला पाहायला मिळतो.
- View this post on Instagram
#welcome @ranumondal.offical #asianet #asianetnews #love #support #india#comedystars
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">