मुंबई - इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमीच सांगितली जाते. 'आई' या शब्दाचं सामर्थ्य सांगणारी ही कथा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बाळाला दूध द्यायला कडय़ावरून उतरण्याचे साहस करणाऱ्या इतिहासातील त्या मातेची कथा प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी", असं ट्विट करीत प्रसादनं याबद्दलची माहिती दिली आहे. प्रसादच्या दिग्दर्शनात बनणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
-
आई भवानीचा आशीर्वाद घेऊन
— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
छत्रपती शिवराय लढले वाघासारखे
आणि राजांचे संस्कार घेऊन
एक आई झाली बाळासाठी वाघीण.
महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा
"हिरकणी"
येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी#हिरकणी #Hirkani #24Oct pic.twitter.com/e8ej6hZaXO
">आई भवानीचा आशीर्वाद घेऊन
— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) August 30, 2019
छत्रपती शिवराय लढले वाघासारखे
आणि राजांचे संस्कार घेऊन
एक आई झाली बाळासाठी वाघीण.
महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा
"हिरकणी"
येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी#हिरकणी #Hirkani #24Oct pic.twitter.com/e8ej6hZaXOआई भवानीचा आशीर्वाद घेऊन
— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) August 30, 2019
छत्रपती शिवराय लढले वाघासारखे
आणि राजांचे संस्कार घेऊन
एक आई झाली बाळासाठी वाघीण.
महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा
"हिरकणी"
येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी#हिरकणी #Hirkani #24Oct pic.twitter.com/e8ej6hZaXO
या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. अशात आता त्याचा हिरकणी चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे. चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.