ETV Bharat / sitara

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित, पाहा पंतप्रधांनांच्या रूपात विवेक ओबेरॉयची नवी झलक - trailer

अलिकडेच या चित्रपटाचे नवे पोस्टर विवेक ओबेरॉयने शेअर केले होते. या पोस्टरमध्ये 'एक बार फिर आ रहे है मोदी', असे कॅप्शन दिले होते. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

'पी. एम. नरेंद्र मोदी' चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित, पाहा पंतप्रधांनांच्या रूपात विवेक ओबेरॉयची नवी झलक
author img

By

Published : May 21, 2019, 1:42 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पी. एम. नरेंद्र मोदी' चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये मोदींच्या जीवनातील विवध घटना दाखवण्यात आल्या आहेत. त्यांच्या रुपात विवेकने या घटना पडद्यावर साकारल्या आहेत.

निवडणुका सुरू होण्यापूर्वीच पीएम मोदी हा बायोपिक प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. प्रदर्शनापूर्वीच वादात अडकलेला हा चित्रपट आता २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे सुरुवातीचे ट्रेलर आणि गाणी यू-ट्यूब वरून हटवण्यात आले होते. मात्र, आता प्रदर्शनाच्या काही दिवस आधी या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या नव्या ट्रेलरमध्ये विवेक ओबेरॉयची दमदार झलक पाहायला मिळते. या ट्रेलरमधुन गांधी घराण्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. अलिकडेच या चित्रपटाचे नवे पोस्टर विवेक ओबेरॉयने शेअर केले होते. या पोस्टरमध्ये 'एक बार फिर आ रहे है मोदी', असे कॅप्शन दिले होते. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

PM Narendra Modi New Trailer release
'पी. एम. नरेंद्र मोदी' चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात बोमन ईराणी, मनोज जोशी, प्रशांत नारायण, झरीना वहाब, बरखा सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यातीन कार्येकर, रमाकांत दायमा, अक्षत साळूजा, जिमेश पाटील आणि दर्शन कुमार हेही कलाकार झळकणार आहेत. एकुण २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.