गेल्यावर्षी घरात बसूनच नवरात्र साजरी करावी लागली होती परंतु यावर्षी कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यामुळे नवरात्र साजरी करता येणार आहे. नवरात्र सुरु झालीय. नवरात्र म्हणजे देवीचा, स्त्री शक्तीचा जागर. नवरात्र म्हणजे नवरंगांचा,सकारात्मकतेचा उत्सव. हा नवरात्रोत्सव अधिकच उत्साही बनवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी'च्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये नवरत्नांचा सहभाग होत आहे. यापूर्वी 'प्लॅनेट टॅलेंट'च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव या तारेतारकांचा समावेश झाला आहे. आता यात नवरत्ने सहभागी होणार आहेत. या नऊ तारका कोण असतील, हे नवरात्रीच्या नऊ दिवसांत कळणार आहे.
'प्लॅनेट टॅलेंट'च्या परिवारात सहभागी झालेल्या या नवरत्नांबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, ''या आधीही 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये अनेक नामवंत तारेतारका सहभागी झाले आहेत. त्याचा फायदा साहजिकच त्यांच्यासह आम्हा सर्वांनाच होत आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की, या नऊ तारका आमच्या परिवारात सहभागी होत आहेत आणि यासाठी नवरात्रीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही.”
अक्षय बर्दापूरकर पुढे म्हणाले की, ‘नवरात्रीच्या निमित्ताने 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये सहभागी होणाऱ्या या तारकांनीही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि 'प्लॅनेट मराठी'मध्ये सहभागी झाल्यानंतर त्या यशाची एक आणखी पायरी चढतील, याची आम्हाला खात्री आहे. आता नव्याने सहभागी होणारे हे नऊ रंग म्हणजेच नऊ तारका कोणत्या असतील, हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’
हेही वाचा - विकी कौशल अभिनित ‘सरदार उधम’मध्ये अमोल पराशर साकारतोय शहीद भगत सिंग!