ETV Bharat / sitara

'देसी गर्ल'साठी निकने खरेदी केला होता महागडा 'बर्थडे केक', किंमत जाणून व्हाल थक्क - प्रियांका चोप्रा

१८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे ग्रॅन्ड सेलिब्रेशनही करण्यात आले होते. आता वाढदिवस म्हटला की केक आलाच. तिच्या वाढदिवशी आकर्षक ठरला होता तो म्हणजे वाढदिवसाचा केक.

'देसी गर्ल'साठी निकने खरेदी केला होता महागडा 'बर्थडे केक', किंमत जाणून व्हाल थक्क
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:48 PM IST

मुंबई - ग्लोबल स्टार 'देसी गर्ल' म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्याबद्दल एकावं ते नवलंच, अशी वेळ चाहत्यांवर आली आहे. सोशल मीडियावर दोघांच्याही अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशाच एका कारणामुळे निक आणि प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

१८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे ग्रॅन्ड सेलिब्रेशनही करण्यात आले होते. आता वाढदिवस म्हटला की केक आलाच. तिच्या वाढदिवशी आकर्षक ठरला होता तो म्हणजे वाढदिवसाचा केक. या केकची इतकी चर्चा होण्यामागचं कारण आता समोर आले आहे.

निकने प्रियांकासाठी या केकची खास ऑफर दिली होती. अगदी तिने परिधान केलेल्या ड्रेसशी मिळता जुळता ५ ताळी केक मागवण्यात आला होता. या केकची किमतही तेवढीच थक्क करणारी आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, मायामीच्या डिवाइन डेविकेसीज केक्सने हा केक तयार केला होता. या केकची कल्पना ही निकचीच होती.

या केकची किंमत तब्बल ३ लाख ४५ हजार इतकी सांगण्यात आली आहे. हा केक बनवण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागला होता. हा केक पाहून प्रियांका देखील अचंबित झाली होती. या केकचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच प्रियांका आणि निकचेही फोटो पाहायला मिळतात. यावेळी परिणीती चोप्रा देखील त्यांच्यासोबत हजर होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.