मुंबई - मन उधाण वाऱ्याचे या मालिकेने एकेकाळी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि मालिकेसोबतच कलाकारांनाही. यात मुख्य भूमिका असलेल्या नेहा गद्रेने तर अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. आता हीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहाने नुकतंच बॉयफ्रेंड ईशान बापटसोबत लग्नगाठ बांधली आहे. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबातील काही मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आता लग्नातील काही फोटो आपल्या चाहत्यांना पाहता यावे यासाठी नेहाने ते सोशल मीडियावर शेअर केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नेहाने आपल्या मेहंदी, रिसेप्शन आणि लग्नसोहळ्यातील ईशानसोबतचे काही फोटो आपल्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">