हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेते सीन कोनेरी यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बाँडचे पात्र सर्वप्रथम साकारण्याचा आणि ते अजरामर करण्याचा मान कोनेरी यांना जातो. एडिनबर्गमधील एका झोपडपट्टीमध्ये वाढलेल्या कोनेरी यांनी कॉफीन पॉलीशर, दुधवाला म्हणूनही काम केले होते. त्यांना शरीरसौष्ठवाची आवड होती त्यातूनच पुढे त्यांना अभिनय क्षेत्रात संधी मिळाली होती.
-
James Bond actor Sir Sean Connery dies at the age of 90: UK media pic.twitter.com/9rVjMBWxut
— ANI (@ANI) October 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">James Bond actor Sir Sean Connery dies at the age of 90: UK media pic.twitter.com/9rVjMBWxut
— ANI (@ANI) October 31, 2020James Bond actor Sir Sean Connery dies at the age of 90: UK media pic.twitter.com/9rVjMBWxut
— ANI (@ANI) October 31, 2020
कोनेरी यांनी १९६२ ला सर्वप्रथम जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. त्यांच्या संवाद फेकीमुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. लोक त्यांना याच भूमिकेमुळे ओळखू लागले. मात्र, स्वत: कोनेरी यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मला त्या जेम्स बाँडचा राग येतो, असे ते म्हणाले होते.
बाँड व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. द विन्ड अँड द लायन(१९७५), इंडियाना जोन्स, लास्ट क्रुसेड(१९८९), कोल्ड वॉर टेल, द हंट फॉर रेड ऑक्टोबर(१९९०) या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
१९८७मध्ये त्यांना 'द अनटचेबल्स' या चित्रपटातील शिकागो पोलीसाच्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जगप्रसिद्ध 'पीपल मासिकाने' वयाच्या ५९व्या वर्षी त्यांना 'सेक्सिएस्ट मॅन अलाईव्ह'चा किताब दिला होता. या वयात हा किताब मिळवणारे ते एकमेव अभिनेता आहेत.