ETV Bharat / sitara

'खामोशी' चित्रपटाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित, प्रभूदेवा-तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत - horrer

काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमय तसेच थ्रिलिंग असणार याचा अंदाज येतो. पहिल्या पोस्टरमध्ये प्रभूदेवाचा चेहरा समोर आला नव्हता. मात्र, नव्या पोस्टरमध्ये प्रभूदेवाचा पूर्ण लूक पाहायला मिळतोय.

'खामोशी' चित्रपटाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित, प्रभूदेवा-तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत
author img

By

Published : May 14, 2019, 1:15 PM IST

मुंबई - दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'खामोशी' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. उद्या म्हणजेच १५ मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Khamoshi film new poster
'खामोशी' चित्रपटाचं नवं पोस्टर

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमय तसेच थ्रिलिंग असणार याचा अंदाज येतो. पहिल्या पोस्टरमध्ये प्रभूदेवाचा चेहरा समोर आला नव्हता. मात्र, नव्या पोस्टरमध्ये प्रभूदेवाचा पूर्ण लूक पाहायला मिळतोय. हा एक हॉरर चित्रपट असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे.

tamanna
तमन्ना भाटीया
prabhudeva
प्रभूदेवा

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रभूदेवाचे रौद्र रूप पाहायला मिळतेय, तर तमन्ना ही घाबरलेल्या अवस्थेत दिसतेय. चक्री टॉलेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ३१ मे रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.