ETV Bharat / sitara

मातृदिनाच्या निमित्ताने करीनाने शेअर केला छोट्या नवाबाचा फोटो, म्हणाली... - करीना कपूर

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तैमूरने त्याच्या छोट्या भावाला हातात पकडले आहे.

kareena-kapoor-shares-first-picture-of-her-new-born-baby-with-taimur-mothers-day-2021
मातृदिनाच्या निमित्ताने करीनाने शेअर केला छोट्या नवाबाचा फोटो, म्हणाली...
author img

By

Published : May 9, 2021, 3:52 PM IST

आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत सगळ्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमूर आणि त्याचा छोटा भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तैमूरने त्याच्या छोट्या भावाला हातात पकडले आहे.

करीनाने हा फोटो शेअर करताना, आज संपूर्ण जग आशेवर अवलंबून आहे आणि हे दोघे येणारा काळ हा चांगला असेल, अशी आशा मला देतात. सगळ्या सुंदर आणि सामर्थ्यवान आईंना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...विश्वास ठेवा, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, करीनाने याआधी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. आज तिने दोन्ही मुलांचा फोटो शेअर करत जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - सारा अली खानचे सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनमध्ये भरभक्कम दान!

हेही वाचा - मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री सुष्मिता सेनचा भावपूर्ण संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.