मुंबई - निर्माता दिग्दर्शक करण जोहरने यंदाची दिवाळी यश आणि रुही या त्याच्या मुलांसोबत साजरी केली आहे. त्याने मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत करण मुला मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. तिघांनीही करण मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली वस्त्रे परिधान केली आहेत.
या सुंदर फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये करणने लिहिलंय, ''मी आणि माझ्या आपल्यांच्यावतीने तुम्हा सर्वांना दिवळीच्या शुभेच्छा. ''
सध्या करण जोहर आगामी 'सूर्यावंशी', 'दोस्ताना 2' आणि पीरियड ड्रामा चित्रपट 'तख्त' याच्या कामात व्यग्र आहे.